esakal | कोरोना रुग्णांचा ५६ हजारांचा टप्पा पार 
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत असले तरी वर्षाच्या सुरवातीच्या टप्प्यात काही प्रमाणात रुग्ण वाढत आहेत.

कोरोना रुग्णांचा ५६ हजारांचा टप्पा पार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दोन दिवस वगळता उर्वरित चार-पाच दिवस नव्या रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या वर नोंदला गेला. सोमवारी नव्याने ६१ रुग्णांची भर पडल्यानंतर एकूण रुग्णसंख्येने ५६ हजारांचा टप्पा पार केला. तर ३४ रुग्ण बरे झाले. आज सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद नाही. 
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत असले तरी वर्षाच्या सुरवातीच्या टप्प्यात काही प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात चार-पाच दिवस रुग्णसंख्या ५०पेक्षा जास्त आढळून आली. शनिवार व रविवारी रुग्णसंख्या तीसच्या आत राहिल्यानंतर सोमवारी पुन्हा ६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ३९ झाली आहे. तर दिवसभरात ३४ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार २४४ झाली आहे. आज सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात एकाही मृत्युची नोंद नसल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. 
 
जळगावात वाढता संसर्ग 
जळगाव शहरात दिवसेंदिवस संसर्ग वाढत आहे. तीन महिन्यांत जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी आढळून येत असली तरी शहरात दररोज सरासरी २०पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारीही शहरात तब्बल २९ रुग्ण आढळून आले, त्यामुळे ॲक्टिव रुग्णसंख्या २१६वर पोचली आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, बोदवड आदी तालुके आज निरंक राहिले. तर भुसावळ १०, चोपडा १२, यावल ३, अमळनेर व पारोळा प्रत्येकी २, जामनेर, रावेर व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला.