esakal | कोरोनाचे पुन्हा पंधरा बळी; बाधितांचा आकडा वाढताच
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाचा आकडा वाढत असून, मागील बारा- तेरा दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा हजाराच्या वर येत आहे. त्‍यानुसार गत चोवीस तासांत जिल्ह्यात १ हजार १९० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले.

कोरोनाचे पुन्हा पंधरा बळी; बाधितांचा आकडा वाढताच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असून आज देखील नवीन १ हजार १९० बाधीत रूग्ण आढळून आली. याच कालावधीत ११४२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. चिंतेची बाब म्‍हणजे आज देखील पंधरा कोरोना बाधीत रूग्‍णांचा मृत्‍यू झाला. 
जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाचा आकडा वाढत असून, मागील बारा- तेरा दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा हजाराच्या वर येत आहे. त्‍यानुसार गत चोवीस तासांत जिल्ह्यात १ हजार १९० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले. याच कालावधीत ११४२ रूग्‍ण बरे होवून घरी गेले. आजच्या बाधीतांमुळे जिल्‍ह्‍यात आतापर्यंत ९८ हजार २८९ जणांचा बाधा झाली आहे.

मृतांचा आकडाही जळगावात जास्‍त
आजच्या अहवालानुसार एकूण आढळून आलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये जळगाव शहरात सर्वाधित २९९ रूग्‍ण आहेत. तर आज जिल्ह्यात १५ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात देखील चार रूग्‍ण हे जळगाव शहरातील आहेत. मृतांचा आकडा कमी होत नसल्‍याने चिंता वाढली आहे. यात जळगाव शहरातील ५५ व ८० वर्षीय पुरूष आणि ५० व ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच अमळनेर तालुका ३, धरणगाव, चोपडा आणि भुसावळ तालुक्‍यात प्रत्‍येकी दोन, रावेर आणि जळगाव तालुक्‍यात प्रत्‍येकी एका रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर २९९, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ९४, अमळनेर १००, चोपडा १६८, पाचोरा ३७, भडगाव ३१, धरणगाव ४३, यावल ३२, एरंडोल १२, जामनेर ४१, रावेर ६८, पारोळा ६५, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ७६, बोदवड ४१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे रूग्ण आढळून आले आहेत

loading image