
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपासून रुग्णसंख्या घटू लागली आहे. जिल्ह्यात रोजचे बाधित रुग्ण कमी होत असताना जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत तर शहरातील रुग्णसंख्या दररोज वीसच्या वर राहत आहे.
जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी जळगाव शहरात संसर्ग वाढतच आहे. शुक्रवारी नव्याने आढळून आलेल्या ४२ रुग्णांमध्ये तब्बल २९ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील असून त्यामुळे शहरातील चिंता वाढली आहे. तर दिवसभरात दोघांच्या मृत्यूसह ४० जण बरे झाले.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपासून रुग्णसंख्या घटू लागली आहे. जिल्ह्यात रोजचे बाधित रुग्ण कमी होत असताना जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत तर शहरातील रुग्णसंख्या दररोज वीसच्या वर राहत आहे. शुक्रवारीही शहरात २९ रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात ४२ नवे बाधित आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ५६ हजार २२५ झाली आहे. शुक्रवारी चोपडा तालुक्यातील ६५ महिला व भुसावळ तालुक्यातील ५६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १३३६ झाली आहे. दिवसभरात ४० रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ३९६वर पोचला आहे.
ॲक्टिव रुग्ण पाचशेच्या घरात
चाचण्या घटूनही रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी केवळ साडे आठशे चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४२ रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रोजच्या रुग्णसंख्येमुळे ॲक्टिव रुग्णसंख्याही पुन्हा पाचशेच्या घरात पोचली असून सध्या ४९३ ॲक्टिव रुग्ण आहेत. पैकी २३८ एकट्या जळगाव शहरातील आहेत.