esakal | लसी उपलब्ध होताच तोबा गर्दी; पोलिस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

लसी उपलब्ध होताच तोबा गर्दी; पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एरंडोल (जळगाव) : म्हसावद नाक्याजवळील दादासाहेब पाटील महाविद्यालयात कोविड प्रतिबंधक लस (Vaccination) घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शहरासाठी सुमारे सातशे लसी प्राप्त झाल्या होत्या. लसीकरण केंद्राजवळ (Covid center) पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. (coronavirus vaccination erandol center people crowd)

म्हसावद रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, हे ठिकाण दूर असल्यामुळे दादासाहेब पाटील महाविद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली. शहरासाठी सातशे लसी प्राप्त झाल्यामुळे गुरुवारी (ता. ६) सकाळपासूनच दादासाहेब पाटील महाविद्यालयात नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महाविद्यालयाच्या पटांगणावर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा: रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक

लस घेण्यासाठी आलेल्‍यांची सुविधा

नगरपालिकेतर्फे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कायम संपर्क ठेवून सूचना केल्या. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी, राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर पाटील, किशोर पाटील, नितीन पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी योग्य नियोजन केले होते. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, हवालदार संदीप सातपुते, अकिल मुजावर, संतोष चौधरी, जितेंद्र तायडे व गृहरक्षक दलाच्या जवानांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. लसीकरण शांततेत पार पडले. लसीकरणासाठी योग्य नियोजन केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.