गावात गर्दी झाल्यास पोलिस पाटील करणार गुन्हा दाखल

corona meet
corona meet
Updated on

धरणगाव (जळगाव) : अनोळखी अथवा बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीस गावात तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासल्‍यानंतरच प्रवेश द्यावा. गावात गर्दी केल्यास पोलिस पाटील यांनी सरळ गुन्हा दाखल करावा; असा आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज दिलेत. 
तहसील कार्यालयात गेल्या आठ दिवसात अधिक रुग्ण आढळून आलेल्या गावातील ग्राम समितीच्या सदस्यांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यात कोरनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसात ज्या गावांमध्ये रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे, आशा गावातील ग्राम समितीच्या सदस्यांची आज तहसील कार्यालयात ग्राम समितीचे सदस्या, गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आशासेविका, रेशन दुकानदार आदींच्या उपस्थित बैठक झाली. यात पाळधी बु., पाळधी खु., रेल, पिंप्री खु., अहिरे खु., सोनवद बु., बांभोरी बु., साळवा, खरदे, पिंपळेसीम या गावांमध्ये अधिक रुग्ण आहेत.

अशा दिल्‍या सुचना 
गावात मास्क वापर करावा, गावात स्वच्छता राखावी, कंटेंटमेंट झोन प्रभावी करणे, रोज गावातील वृद्ध आणि मधुमेह असणारे यांचे ऑक्सिजन रिडींग घेणे, गावात किमान एक ऑक्सिजन सिलेंडर घेणे, लग्न/साखरपुडा गर्दी होऊ न देणे, होम आयसोलेशनचे रुग्ण गावाबाहेर शाळेत ठेवणे, बाहेरील येणाऱ्या व्यक्तीचे तापमान ऑक्सिजन मोजून व अर्जेन्ट काम असेल तरच गावात प्रवेश द्यावा. शिवाय पोलीस पाटील यांना सांगून मुसाफिर रजिस्टर ठेवावे. अशा उपाय योजना ग्राम समितीने करण्याचे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Marathi News Esakal
www.esakal.com