esakal | गाळे सील निर्णयाविरोधात मार्केटचे बंद आंदोलन; फुले मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसाद 

बोलून बातमी शोधा

jalgaon market}

महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपली होती. याबाबत महासभेत ठराव करुन १८ व्यापारी संकुलांपैकी १४ व्यापारी संकुल अव्यावसायिक तर ४ व्यापारी संकुल व्यवसायिक असे वर्गीकरण केले होते.

jalgaon
गाळे सील निर्णयाविरोधात मार्केटचे बंद आंदोलन; फुले मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसाद 
sakal_logo
By
भुषण श्रीखंडे

जळगाव : महापालिकेच्या मालकिच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ ला संपली. तेव्हापासून जवळपास २ हजार ३७६ गाळेधारकांकडे थकबाकी आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारपर्यंत थकबाकी न भरल्यास गाळे सीलची कारण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मनपा प्रशासनाच्या या भूमीकेच्या विरोधात महापालिका मार्केट संघटनेने पुकारलेले मार्केट बंद आंदोलनाला प्रतिसाद मिळाला असून शहरातील १६ व्यापारी संकुलातील १३०० गाळेधारकांनी आपआपली दुकाने आज बंद ठेवली आहेत. काही मार्केटमध्ये मात्र थोड्या प्रमाणात दुकाने सुरु होती. तसेच महापालिका मार्केट संघटनेतेर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देवून गाळेधारकांवर महापालिका प्रशासन अन्याय करत असल्याचे नमुद केलेले आहे. 

जळगाव महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपली होती. याबाबत महासभेत ठराव करुन १८ व्यापारी संकुलांपैकी १४ व्यापारी संकुल अव्यावसायिक तर ४ व्यापारी संकुल व्यवसायिक असे वर्गीकरण केले होते. तरी देखील अव्यावसायिक संकुलातील गाळेधारकांना लाखोंची अवाजवी बिले दिली. त्यामुळे अव्यवसायिक संकुलातील गाळेधारकांना आलेल्या आवाजवी बिले भरू शकत नसल्याची भूमिका आहे. त्यात राज्यात एकूण २७ महापालिकेचे मार्केट आहेत. त्यातील सर्व मार्केटमधील गाळेधारकांचे नूतनीकरण व जुने भाडे व इतर टॅक्सचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, महापालिका तब्बल २५० पट दंड लावून गाळेधारकांना पैसे भरण्यास जबरदस्ती करत आहे. अनेकांना सवलत मनपा देत आहे मात्र गाळेधारकांवर कारवाईचा का केली जात आहे असा प्रश्‍न गाळेधारक संघटनेने प्रश्‍न उपस्थित केला आहे. मनपा प्रशासनाने सीलच्या कारवाईचा इशारा दिल्यामुळे शहरातील आज शुक्रवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्यानुसार रामलाल चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी.जे. मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, शामाप्रसाद मुखर्जी उद्यानजवळील मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहू मार्केट, धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांनी आजपासून दुकाने बंद ठेवली आहेत. 

गाळे सील करु नये 
गाळेप्रश्नी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अधिवेशनानंतर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. तो पर्यंत कारवाई करु नये, असे संघटनेच्यावतीने आयुक्तांना सांगीतले. परंतू मनपा प्रशासन प्रतिसाद देत नसल्याने आज पासून मार्केट बंद आंदोलन गाळेधारकांनी पुकारले आहे. गाळेधारक संघटना आंदोलनावर ठाम असल्याचेही अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले. 

बिलाची थकबाकी निर्लेखित करा 
मनपा अधिनियम १९४९ चे कलम १५२ प्रमाणे गाळेकरार नुतनीकरण किंवा गाळेलिलाव करण्यापूर्वी अविकसीत १४ मार्केटमधील सर्व गाळेधारकांची संपूर्ण रक्कम निर्लेखित करण्याची मागणी केली आहे. तसेच मनपाने कारवाई केल्यास गाळेधारक आपल्या कुंटुबियांसह आंदोलन करेल असा इशारा गाळेधारक संघटनेने दिला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे