esakal | बैलगाडीचा लागला धक्‍का; दोन गटांत हाणामारी
sakal

बोलून बातमी शोधा

fighting in two group

बैलगाडीचा लागला धक्‍का; दोन गटांत हाणामारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : बैलगाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तालुक्यातील सुभाषवाडी येथे दोन गटांत हाणामारी (Fighting in two groups) झाल्याची घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी पाचला घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Jalgoan police) याप्रकरणी परस्परविरुद्ध १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (crime news fighting in two groups)

सुभाषवाडी (ता. जळगाव) येथील शेतकरी पुंडलिक राठोड (वय ३२) यांच्या तक्रारीनुसार, शेतीकामासाठी त्यांच्याकडे बैलजोडी आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास बैलगाडीने ते गावातून जात असताना सुभाष चव्हाण याच्या घरासमोरील अंगणात वाळूने भरलेल्या गोणीला बैलगाडीचा धक्का लागला. या कारणावरून पुंडलिक राठोड याला सुभाष चव्हाण, सूरज चव्हाण, मनोज चव्हाण, उत्तम चव्हाण यांनी बेदम मारहाण केली. राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: गिरीश महाजनांनी साधला निशाणा.. म्‍हणाले ते चार पालकमंत्री कमकुवत

मुलगी घासत होती अंगणात भांडी

दुसऱ्या गटातील सुभाष चव्हाण (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुभाष चव्हाण यांची मुलगी अंगणात भांडी घासत असताना भांड्याला बैलगाडीचा धक्का लागला यावर मुलीने बैलगाडी दुरून घेता येत नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने पुंडलिक राठोड यांच्यासह राजेश राठोड, नीलेश राठोड, श्रावण राठोड, गोपीचंद राठोड, बंटी राठोड, जितू राठोड यांनी सुभाष चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी सुभाष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल आहे.