esakal | गिरीश महाजनांनी साधला निशाणा.. म्‍हणाले ते चार पालकमंत्री कमकुवत
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan

गिरीश महाजनांनी साधला निशाणा.. म्‍हणाले ते चार पालकमंत्री कमकुवत

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : राज्यात वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यात ऑक्सीजन, रेमडेसिव्हिर (Remdesivir) मुबलक प्रमाणात उपलब्ध करीत आहेत, परंतु उत्तर महाराष्ट्रात त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचे पालकमंत्री अत्यंत कमकुवत मंत्री असल्याचा टोला पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार व के. सी. पाडवी ह्यांची नाव न घेता भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांनी लगावला. (political news girish mahajan target in mahavikas aaghadi leader)

उत्तर महाराष्ट्रात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेकश्‍नच्या तुटवड्या बाबत त्यांनी चिंता व्यक्त श्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले की, राज्यात मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यात ऑक्सीजन, रेमडेसिव्हिरचा मुबलक साठा आहे. ठराविक जिल्ह्यात ऑक्सीजन, रेमडेसिव्हिरचा मुबलक साठा आहे. इतर जिल्ह्यात त्या मानाने अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.

हेही वाचा: रिक्षाचालकाचा मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला इस्त्रोत संशोधक

उत्‍तर महाराष्‍ट्रात भयावह स्‍थिती

विशेषत: उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी अत्यंत भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे ही परिस्थिती व वस्तुस्थिती लक्षात घेता जे वजनदार मंत्री आहेत ते आपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा करीत आहेत, बाकीच्या ठिकाणी अत्यंत विदारक स्थिती आहे.

हेही वाचा: दुर्देवी: आईचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू; लेकीने केले सॅनिटायझर प्राशन

त्‍या पालकमंत्र्याची नावे न घेता टोला

उत्तर महाराष्ट्रात नाशिक (पालकमंत्री छगन भुजबळ), जळगाव (पालकमंत्री गुलाबराव पाटील), धुळे (पालकमंत्री अब्दुल सत्तार) व नंदुरबार (पालकमंत्री के सी पाडवी) जिल्ह्यांचे पालकमंत्री हे कमकुवत मंत्री असल्याने या जिल्ह्यातील परिस्थिती भयावह असल्याचा टोला त्यांनी या मंत्र्यांचे नाव न घेता या जिल्ह्यांमधील परिस्थितीचा उल्लेख करीत लगावला. दरम्यान, महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात आठवड्याला दोन ऑक्सिजन टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता.५) त्यांनी एक टँकर जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्दही केले. त्या नंतर त्यांनी सत्ताधारी मंत्र्यावर टीका केली.