esakal | सहा वर्षीय बालिकेवर अत्‍याचार
sakal

बोलून बातमी शोधा

girl torture

सहा वर्षीय बालिकेवर अत्‍याचार

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पहूर (जळगाव) : पहूर (ता. जामनेर) शहरात राहणाऱ्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पहूर शहरात वास्‍तव्यास असलेली पिडीत सहा वर्षीय मुलगी आई- वडीलांसह राहते. शनिवारी (१७ एप्रिल) दुपारी बाराच्या सुमारास पिडीत मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातील अकबर युसूफ तडवी (वय ४०, रा. खंडेरावनगर पहूरपेठ) याने फुस लावून मुलीला उचलून नेले. गावातील निर्जळ ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर पहूर पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अकबर तडवी याच्याविरूध्द बाल लैगिंक अत्याचार अन्वये पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि अमोल देवढे करीत आहे.

देवीचे दागिने नेले चोरून

यावल : महेलखेडी (ता. यावल) येथील श्री सप्तश्रुंगी माता मंदीरातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पहाटे उघडकीस आली. महेलखेडी येथील मंदीरात आज मध्यरात्रीच्या सुमारास चौकातील अंधारचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदीरातील मूर्तीच्या अंगावरील २० ग्रॅमच्या सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याची पोत, श्री सप्तश्रुंगी माता मंदीराचे लोखंडी दार तोडुन चोरून नेल्याची घटना घडली आहे. भाविक बाळु राजु झुरकले हे सकाळी मंदीरात पुजेसाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या निर्देशनाश आला. पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजपुर मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सिंकदर तडवी यांनी भेट घेवून माहिती घेतली.