esakal | पती- पत्‍नीचे खून प्रकरण; भल्‍या पहाटे पोलिसांची कारवाई, चौघांना घेतले ताब्‍यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime murder case

पती- पत्‍नीचे खून प्रकरण; भल्‍या पहाटे पोलिसांची कारवाई, चौघांना घेतले ताब्‍यात

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खून प्रकरणाचा पाचव्या दिवशी उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी आज पहाटे चारच्‍या सुमारास चार जणांना ताब्यात घेतले. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

कुसुंबा खुर्दच्या ओमसाईनगरातील मुरलीधर पाटील (वय ५४) व त्यांची पत्नी आशाबाई (वय ४७) यांच्या हत्या प्रकरणाला पाच दिवस लोटले असून, मारेकरी सापडू शकले नाही. आजवरच्या तपासात केवळ पैशांच्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत अशाबाई यांनी व्याजाने पैसे वाटल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी केल्‍यानंतर खूनाचा उलगडा झाला असून भल्‍या पहाटे चौघांना ताब्‍यात घेतल्‍याची कारवाई केली.

व्याजाचे पैसे अन्‌ जुना वाद

पती- पत्‍नीच्या खून प्रकरणात जळगाव शहरामधून तिघांना तर एकाला पहूर येथून ताब्यात घेतले. सदर खून हा व्याजाचे पैसे तसेच जुन्या वादातून केल्याची कबुली ताब्‍यात घेतलेल्‍या चौघांनी दिली आहे. त्‍यांच्याकडून आशाबाई पाटील यांच्या अंगावरील दागिनेही हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

होता सुपारी किलिंगचा संशय

घटनास्थळाची परिस्थितीनुसार वस्तुनिष्ट अभ्यासाअंती मारेकरी कसे आले असावेत, घरात शिरण्यापासून ते, हत्येनंतर पळून जाण्यापर्यंत सर्व काल्पनिक सीन उभा करण्यात आला. मुळात आशाबाई पाटील यांचा व्याजाचा व्यवसाय होता. लाखो रुपयांच्या भिशीत गुंतवणूक आणि व्याजाने पैसा वाटप केल्याने अनेकांशी त्यांची ओळखी होती. हजार, दहा हजारांपासून ते चक्क १५ लाखांपर्यंत व्याजावर पैसा त्यांनी लावला आहे. व्याजाचा पैसा दिला नाही, तर पैसा वसुलीचे तंत्रही त्यांच्याकडे होते. स्थानिक कोणीतरी सुपारी देत बाहेरच्या जिल्ह्यातून मारेकरी बोलावल्याचा संशय सुरवातीला पोलिसांना होता.

loading image