
पैसे आणतो असे म्हणत डोळ्यादेखत माल घेवून पसार झाला होता. तर, स्नोबॉल आईस्क्रीम या दुकानातून असाच माल काढून घेत पैसे न देताच माल घेवुन पळून
जळगाव : शहरातील मोहन नगर येथे भाड्याने घर घेवुन वास्तव्यास असलेल्या पितापुत्रास रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात धेतले आहे. शहरातील विवीध रहिवाशी वस्त्यांमधील दुकानांमध्ये या बाप लेकाने चोरीचे धंदे चालवल्याचे स्पष्ट झाले असून रामानंदनगर पोलिसंठाण्यात १५ ते १६ दुकानदार तक्रारीसाठी एकत्र आले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर मात्र, रात्री उशिरा पर्यंत पेलिसांना झुलवत सर्व तक्रारींचा इन्कार केला आहे.
शहरातील सुयोग कॉलनी गिरणा टॉकीज परीसरात शैलेष भाटिया यांचे श्रीनाथ जी प्रोव्हीजन म्हणुन दुकान आहे. सप्टेंबर महिन्यात एक तरुण त्यांच्या दुकानात आला तीन-चारशे रुपयांचा माल घेवून माझे वडील रस्त्याच्या पलिकडे आहे पैसे आणतो असे म्हणत डोळ्यादेखत माल घेवून पसार झाला होता. तर, स्नोबॉल आईस्क्रीम या दुकानातून असाच माल काढून घेत पैसे न देताच माल घेवुन पळून गेल्याचे जगदीश भोळे यांनी सांगीतले. सोबतच दत्त डेअरी तून तूप धेवून पळाल्याचे मॅनेजर ने सांगीतले. या सर्व तक्रारदारांना पोलिसांनी आज ताब्यातील दोघा बाप-लेकांच्या ओळखीसाठी बोलावले होते. फसवणुक झालेले इतरही आठ-दहा दुकानदार पोलिस ठाण्यात आले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुनील नारायण शिंदे (वय-५०) यांच्यासह मुलगा परेश यालाही तक्रारदारांनी पोलिसांदेखत ओळखले आहे.
अशी झाली अटक
मोहन नगरात भामटे राहत असलेल्या घर मालकांनी खोली खाली करण्यासाठी सांगीतली. माझ्या मुलाचे लग्न आहे तूम्ही दुसरे घर बघा असे सांगीतल्याने खोली खाली करण्यास नकार देत उलट घर मालकालाच पेलिसांच्या धमक्या देत सुनील शिंदे रामानंदनगर पेलिसांत पोचला. पोलिस ठाण्यात आल्यावर घडला प्रकार सांगत असतांनाच गुन्हेशोध पथकातील सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, प्रविण जगदाळे यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याची चौकशी करत गेल्या दोन-तीन महिन्यांपासुन तक्रार करणाऱ्या दुकानदारांना त्यांनी पाचारण केले. सर्वांनीच या पिता-पुत्राची ओळख पटवली असून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे सादर केले आहे. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
संपादन ः राजेश सोनवणे