म्‍हणूनच मी खडसेंच्या घरी गेलो : फडणवीस

म्‍हणूनच मी खडसेंच्या घरी गेलो : फडणवीस
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDevendra Fadnavis
Updated on: 

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज जळगाव जिल्‍ह्‍यातील मुक्‍ताईनगर, रावेर तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी दौऱ्यावर असताना ते कोथळी येथील खडसेंच्या घरी गेले. यामुळे सर्वत्र चर्चा रंगली. परंतु, खडसेंच्या घरी का गेले? याबाबत फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले. (jalgaon-news-Devendra Fadnavis-went-to-Khadse-house)

एकनाथराव खडसे यांनी राष्‍ट्रवादीत (Eknath khadse ncp leader) प्रवेश केल्‍यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जिल्‍ह्‍यात प्रथमच दौरा झाला. मुक्‍ताईनगर तालुक्‍यात नुकसानीचा पाहणी दौऱ्यावर असताना फडणवीस हे प्रथम खडसेंच्या घरी गेले. याबाबत रंगलेल्‍या चर्चेबाबत फडणवीस यांनी स्‍पष्‍ट करताना सांगितले, की खासदार रक्षा खडसे (BJP mp raksha khadse) या भाजपच्या खासदार असून त्‍यांनी घरी चहासाठी बोलाविले असल्‍याने खडसेंच्या घरी गेल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Devendra Fadnavis
फडणवीस खडसेंच्या घरी; चर्चा मात्र कमळाच्या घड्याळाची

मराठा आरक्षणाबाबत सर्वांनी एकत्र यावे

मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. या विषयी सरकारने आम्‍हाला चर्चेसाठी बोलाविले तर नक्‍कीच जाणार आणि पुर्ण सहकार्य राहणार. यात कोणत्‍याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. मात्र कोणी राजकारण करत असेल तर त्‍यास उत्‍तर देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या विरोधात कोणत्‍याही प्रकारची भुमिका संभाजीराजे यांनी मांडली नसल्‍याचे देखील त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com