
एकनाथ खडसे, रोहिणी खडसेंना ट्विटरवरून शिवीगाळ
जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, तसेच त्यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांना ट्विटर अकाउंटवरून एका यूजरने अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ केली. या प्रकरणी एकाविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-eknath-khadse-and-rohini-khadse-twiter-account-cyber-crime)
हेही वाचा: ‘डेल्टा प्लस’चा थेट फुफ्फुसांवर परिणाम
जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. खडसे यांनी भाजपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण आंदेालनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २४) अकराच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक खात्यावरून ट्विट केले होते. भाजपला ओबीसींचा कधीपासून पुळका आला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात काय अर्थ... अशा आशयाचे ट्विट करून भाजपला लक्ष्य केले होते. त्यावर सपोर्ट यूथ (support youth@nagma216) या अकाउंटवरून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शिवराळ भाषेचा वापर करून टीका करण्यात आली होती. या प्रकरणी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुहास चौधरी, सुशील शिंदे, अमित वाणी यांनी सायबर पोलिस ठाण्यात कारवाईचे निवेदन दिले. सायबर पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत अशोक लाडवंजारी यांच्या तक्रारीवरून अक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संबंधित ट्विटर अकाउंटचालकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बळिराम हिरे तपास करीत आहेत.
Web Title: Marathi Jalgaon News Eknath Khadse And Rohini Khadse Twiter Account Cyber
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..