जिल्‍हा परिषद महिला सदस्‍याविरूद्ध गुन्हा; आंदोलन करणे पडले महागात

जिल्‍हा परिषद महिला सदस्‍याविरूद्ध गुन्हा; आंदोलन करणे पडले महागात
jalgaon police fir
jalgaon police firjalgaon police fir

जळगाव : धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माधूरी अत्तरदे (Jalgaon zilha parishad) यांच्यासह सहा जणांविरूध्द गुन्हा (police fir) दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. (expensive to agitate when there was a curfew order)

सावळा- बांभोरी गटातून जिल्‍हा परिषद सदस्‍या म्‍हणून निवडून आलेल्‍या माधुरी अत्‍तरदे यांच्यासह बांभोरीचे माजी सरपंच राकेश नन्नवरे, कविता नन्नवरे, वर्षा झोपे, नयना चौधरी, सुनिता बोरोले यांनी धरणगावात असलेल्‍या समस्‍या घेवून नागरीकांना न्याय देण्यासाठी विविध मागण्यांसाठी तहसीलदार नितीन देवरे यांच्याविरोधात गुरूवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

jalgaon police fir
पत्‍नीलाच म्‍हणाला दुसरे लग्‍न करायचेय; दुसरा विवाह करताच पत्‍नीने घेतला असा निर्णय

म्‍हणून त्‍यांच्यावर गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदीचे आदेश असतांना तसेच साथरोग प्रतिबंध कायदा लागून असतांना देखील बेकायदेशीररित्या ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी जि.प. सदस्या माधूरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरुद्ध कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस विकास पहूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र सुरवाडे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com