एक लाख टन खतांचा साठा जुन्या दराचाच

एक लाख टन खतांचा साठा जुन्या दराचाच
fertilizer
fertilizerfertilizer

सावदा (जळगाव) : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण सांगत देशभरातील रासायनिक खत (Chemical fertilizer) कंपन्यांनी मिश्र खतांच्या दरात तब्बल ५८ टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. पण ही वाढ खूपच मोठी असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजी आहे. जिल्ह्यात अजूनही एक लाख टन खतांचा साठा जुन्या भावाचा आहे. ती खते शेतकऱ्यांना जुन्या भावानेच मिळावीत व केलेली भाववाढ कमी करून मिळावी, अशी मागणी होत आहे. (One lakh tonnes of fertilizer stock at the old rate)

fertilizer
एकमेकांचा हात पकडत घेतली पुलावरून उडी; पती- पत्‍नी अन्‌ मुलीचा समावेश

जिल्ह्यामध्ये यूरिया पोटॅश यासह विविध मिश्रखते (खरीप हंगामातील) एक लाख टन उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी खतांच्या बॅगेवरील छापील किमतीनुसारच खते खरेदी करावीत, अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली. खत दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनीच काय पण केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीसुद्धा मागणी केली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनीही केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्राद्वारे खतांचे भाव कमी करण्याची मागणी केली आहेच. खतांच्या भाववाढीबाबत प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडला आहे. भाववाढीमुळे शेतकरी भरडला जात असून, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहेत. नवीन खते सध्या गोडाउनमध्ये असून, ती कृषी दुकानचालकांकडे मोजकी आहेत.

अन्यथा अनुदान वाढवून द्यावे

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांना लागणाऱ्या विविध कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळेच रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे दर वाढले असून, शासनाकडून दिले जाणारे अनुदान मात्र जैसे थे आहे. सरकारने अनुदान वाढवून दिल्यास खतांचे भाव स्थिर राहतील अन्यथा येत्या महिन्याभरानंतर वाढीव दरानेच शेतकऱ्यांना खते खरेदी करावी लागतील, अशी माहिती एका खत कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.

fertilizer
‘जेडीसीसी’चे ६० टक्के खरीप कर्जवाटप; राष्ट्रीयीकृत बँकांचे हात वरच

जिल्ह्यात दर वर्षी खरीप हंगामासाठी साडेतीन लाख टन खतांचे नियोजन असते. त्यांपैकी जुन्या दरातील एक लाख टन यूरिया पोटॅशसह विविध मिश्रखते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या बॅगेवर असलेले दरपत्रक व कृषीचालक दुकानदारांकडील बिलांची शहानिशा करून खते खरेदी करावीत व या दोघांमध्ये तफावत आढळल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीकडे तक्रार नोंदवावी, यात कृषी दुकानचालक दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

- वैभव शिंदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जळगाव

जिल्ह्यातील खतांची उपलब्ध आकडेवारी पॉस मशिनची आहे. कृषी केंद्रांवर दररोज विक्री होणारा माल पॉस मशिनमधून वजा केल्यास जी आकडेवारी येईल, ती खरी आकडेवारी आहे. पण प्रत्यक्षात कृषी दुकानांवर मोठ्या प्रमाणात खतांची विक्री होत असल्याने शिल्लक खतांची विक्री जुन्याच दरात सुरू आहे.

-विनोद तराळ, राज्य अध्यक्ष, माफदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com