‘जेडीसीसी’चे ६० टक्के खरीप कर्जवाटप; राष्ट्रीयीकृत बँकांचे हात वरच

‘जेडीसीसी’चे ६० टक्के खरीप कर्जवाटप; राष्ट्रीयीकृत बँकांचे हात वरच
jdcc bank
jdcc bankjdcc bank

जळगाव : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) जिल्हा बँका, खासगी बॅंका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज (Farmer loan) घेणे सुरू केले आहे. त्यासाठीचा ७/१२ उतारा, इतर कागदपत्रे बॅंकांकडे जमा केली आहेत. काहींनी कर्ज घेण्याची प्रक्रिया मार्चअखेरपासूनच सुरू केल्याने आतापर्यंत जिल्हा बँकेच्या ६० टक्के (JDCC Bank) शेतकरी सभासदांना कर्जही मिळाले आहे. यंदा जिल्हा बँकेने ८० हजार १७१ सभासदांना ३२८ कोटींचे कर्जवाटप केले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी ‘सकाळ’ला दिली. (60 per cent kharif loan disbursement from JDCC)

jdcc bank
अखेर गोशाळेतील गायींना मिळाला चारा

जिल्ह्यात लॉकडाउन असतानाही जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. जिल्हा बँकेला ५२४ कोटींचे खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांपैकी बँकेने आतापर्यंत ८० हजार १७१ सभासदांना ३२८ कोटी १५ लाख ३१ हजार ८०१ एवढे कर्जवाटप केले. यामुळे जिल्हा बँकेचे सभासद असलेला सभासद शेतकरी खरिपासाठी लागणारे बियाणे, खते, नवीन बैलजोडी इतर साधने घेण्यासाठी मोकळा झाला आहे. लॉकडाउनमुळे सर्वत्र रोजगार बंद आहेत. शेतकऱ्यांच्या हातात मात्र कर्ज उपलब्ध झाल्याने तो आनंदात आहे.

राष्‍ट्रीयकृत बँकांचा हात आखडता

राष्ट्रीयकृत बॅंकांनी मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज देण्यास हात आखडता घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत दोन हजार ५४९ सभासदांना ३६ कोटी ३८ लाख (४.७६ टक्के), तर खासगी बँकांनी ३२९ सभासदांना ५६ कोटी (५.६५ टक्के) कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केल्यावर लगेच कर्ज द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

jdcc bank
अमळनेर परिसरातील गावे होणार पाणीदार

मशागतपूर्व कामे सुरू

नुकतीच चक्रीवादळामुळे शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा वेचणे, बांधावरील गवत जाळणे, शेत स्वच्छ करणे व मशागतीसाठी ते तयार करणे अशी कामे सुरू आहेत.

मुख्यमंत्री उद्या घेणार आढावा बैठक

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक येत्या गुरूवारी (ता.२०) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्ही.सी.द्वारे होणार आहे. दुपारी तिनला ही बैठक होईल. बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्ही.सी.द्वारे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी सभापती, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, महावितरणचे अधिक्षक अभियंता असतील.

लॉकडाऊन असतानाही जेडीसीसी बँकेने ३२८ कोटीचे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. पिक कर्जातून ते खरिपाचे बियाणे, खते खरेदी करतील. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे चांगले उत्पादन येईल.

- संतोष बिडवाई, जिल्हा उपनिबंधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com