यशस्वी प्रयोग..‘जिरेनियम’ लागवडीतून चार लाखाचे उत्‍पन्‍न

यशस्वी प्रयोग..‘जिरेनियम’ लागवडीतून चार लाखाचे उत्‍पन्
farming geranium
farming geraniumfarming geranium

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील सायगाव येथील शेतीत वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन घेणाऱ्या तरुण शेतकऱ्याने पहिल्यांदाच जिरेनियम (farming-geranium-in-success) या औषधी पिकाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. चाळीसगावच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यातील जिरेनियमची ही एकमेव शेती ठरली आहे. एक एकरमध्ये साधारणतः साडेतीन ते सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळवून देणारे हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरले आहे. (jalgaon-news-farmer-new-concept-farming-geranium-in-success)

सायगाव (ता. चाळीसगाव) शेतीच्या बाबतीत तसे बागायती क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गावातील वसुंधरा सेंद्रिय बहुउद्देशीय शेतकरी (Farmer) गटाचे अध्यक्ष मंगेश महाले या कीटकशास्त्रात एम. एस्सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुण शेतकऱ्याने जिरेनियमच्या लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला. जो आज आदर्शवत ठरला आहे. महाले यांनी आपल्या एक एकर शेतात सुगंधी वनस्पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व बाजारात प्रचंड मागणी असलेल्या जिरेनियम पिकाची लागवड केली. लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन व काळजी घेतल्याने सद्यःस्थितीत हे पीक चांगलेच बहरले आहे.

farming geranium
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला स्वयंपूर्ण केले !

अशी सूचली कल्पना

मंगेश महाले उत्तर प्रदेशातील बरेली येथील केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थानमध्ये कुकुटपालनाच्या व्यवसायावर आधारित प्रशिक्षणासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना जिरेनियमची शेती पाहण्याचा योग आला. त्यामुळे त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. आपणही आपल्या भागात असा प्रयोग करू शकतो का, यासाठी त्यांनी जिरेनियमचा सखोल अभ्यास करण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासह पुणे, नाशिक, नगर, संगमनेर, अकोले, सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंगलज, कर्नाटकातील बेळगाव अशा अनेक ठिकाणी भेट देऊन सखोल अभ्यास केला. गावी आल्यानंतर जिरेनियमची लागवड करून त्याचे चांगले उत्पादन घेऊन हा प्रयोग यशस्वी केला.

काय आहे जिरेनियम

जिरेनियम पिकाचे शास्त्रीय नाव ‘पेलागोनियम ग्रेवियोलेंस जिरेनियम’ असून, ही झुडुपवर्गीय बहुवार्षिक वनस्पती आहे. विविध हवामानात वाढणारी, पाण्याचा ताण सहन करणारी असल्याने जास्त आर्द्रता, पाऊस व धुके तिला मानवत नाही. हलक्या ते भारी जमिनीत तसेच काळ्या कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत या वनस्पतीची वाढ चांगली होते. एका एकरामध्ये दहा ते ११ हजार रोपांची लागवड करता येते. जिरेनियमची रोपे सरी पाडून लागवड केली जातात. त्यासाठी तीन किंवा चार फुटाचे अंतर दोन सऱ्यांमध्ये असावे. दोन रोपांतील अंतर एक ते दीड फूट असावे. पिकाला जास्त पाणी देता येत नसल्याने ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य आहे. एकदा लागवड केल्यास तीन ते पाच वर्षे चालते. एका एकरामध्ये एका वर्षात साधारणतः ४० टन बारोमास उत्पादनातून ३० ते ४० किलो तेल मिळते. या तेलाचा बाजारात भाव साडेबारा हजार रुपये किलो असा आहे. त्यामुळे एकरामध्ये साधारणतः साडेतीन ते सव्वाचार लाखांचे उत्पन्न घेता येते. या तेलाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने, पानमसाला उद्योग, साबण, अत्तर, सुगंधी उद्योग, सुगंधित उपचार आणि औषधांसाठी केला जातो.

ज्या शेतकरी बांधवांना जिरेनियमची लागवड करायची आहे, त्यांना जिरेनियमच्या रोपांसह वर्षभर लागणाऱ्या औषधांचा पुरवठा करू. लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्लॉट व्हिजिट तसेच, संपूर्ण मोफत योग्य ते मार्गदर्शन आपण करू. या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे. हे पीक फायद्याचे असून, यात कुठलाही तोटा किंवा फसवेगिरी नाही. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेण्यापेक्षा हे पीक घ्यावे.

- मंगेश महाले, सायगाव (ता. चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com