पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला स्वयंपूर्ण केले !

सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू ठेवून अनेक निर्णय घेतले
Girish-mahajan
Girish-mahajanGirish-mahajan
Updated on: 

जळगाव ः देशामधील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारने अतिशय शांत पद्धतीने सोडविले. तसेच देशाला स्वयंपूर्ण करून त्यांनी जगात भारताची मान त्यांनी उंचावली असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी व्यक्त केले.

(mla girish mahajan said prime minister narendra modi India self-sufficient)

Girish-mahajan
नाथाभाऊंच्या सांगण्यावरून मुक्ताईनगरचे नगरसेवक शिवसेनेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाले या निमित्त ते बोलत होते. पुढे बोलतांना आमदार श्री. महाजन म्हणाले, की मोदी सरकारला सात वर्ष झाले असले तरी आधीचे पाच वर्षाची सरकारमध्ये इतर पक्ष होते. त्यानंतर भाजपला देशातील नागरिकांनी स्पष्ट बहुमत दिले. आणि दोन वर्षात पंतप्रधान मोदीनीं अनेक ऐतिहासिक निर्णय घेतला. यात रामजन्म भूमीचा प्रश्न, काश्मीर मधील कलम ३७० चा कायदा रद्द केला, तसेच मुस्लीम समाजातील महिलांसाठी जाचक असलेला तीन तलाकचा कायदा रद्द करून मुस्लीम महिलांना न्याय मिळून दिला. हे तिन्ही निर्णय जातीय तेढ निर्माण न होता त्यांनी शांततेत सोडवीला.

भ्रष्टाचार मुक्त देशासाठी प्रयत्न

नरेंद्र मोदीनीं सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू ठेवून अनेक निर्णय घेतले. यात शेतकऱ्यांना, आर्थिक दुर्बल घटकांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करणे, तसेच शेवटच्या घटकापर्यंत मदत कशी पोहचेल याला त्यांनी प्राधान्य दिले.

Girish-mahajan
मान्सूनपूर्व पावसाचा जळगाव जिल्ह्याला तडाखा !

देशाची मान उंचावली

कोरोना महामारीच्या संकटात धाडसाने सामोरे जावून देशाला स्वयंपूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे जगात भारताचे स्थान उंचावत इतर देशांना आपण मदत, वैद्यकीय सुविधा, साहित्य देण्याचे काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com