esakal | जामनेरचे माजी नगराध्यक्ष ललवाणींवर गुन्हा दाखल; बालविवाह, छेडछाडीचा आरोप 

बोलून बातमी शोधा

police fir}

गेल्या नऊ डिसेंबर २०२० ला शहरात फिर्यादी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. दरम्यानच्या काळात तिच्या मनाविरुद्ध लैंगिक छळ व छेडछाड करण्यात येऊन तिला मानसिक त्रास देण्यात आला

जामनेरचे माजी नगराध्यक्ष ललवाणींवर गुन्हा दाखल; बालविवाह, छेडछाडीचा आरोप 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जामनेर (जळगाव) : शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी व माजी नगराध्यक्ष पारस झुंबरलाल ललवाणी यांच्यासह सात संशयितांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा व बालकांचे लैंगिक छेडछाड आदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी दिली. 
माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलीसांत त्यांच्यासह सात जणांवर बाल लैंगीक कायद्याच्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे दाखल झाला असून शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग झाला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सात जणांवर गुन्हा
गेल्या नऊ डिसेंबर २०२० ला शहरात फिर्यादी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. दरम्यानच्या काळात तिच्या मनाविरुद्ध लैंगिक छळ व छेडछाड करण्यात येऊन तिला मानसिक त्रास देण्यात आला म्हणून माजी नगराध्यक्ष पारस झुंबरलाल ललवाणी, चंदुलाल सुहालाल कोठारी (सावत्र वडील), सुनील कोचर, वृषभ विकास ललवाणी (पती), विकास ललवाणी (सासरे), भावेश ललवाणी (दीर), भावना विकास ललवाणी (सासू) अशा एकूण सात जणांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक किशोर पाटील तपास करीत आहेत. 

सावत्र बापाकडूनही त्रास
पिडीत तरुणीचे सावत्र बाप असलेले चंदुलाल कोठारी आणि मानलेले मामा सुनील कोचर या दोघांनाही पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने विवाह योग्य नसल्याचे तिची आई सांगत होती. तरी सावत्र बाप घरात आईला व स्वतःला मारहाण करीत असल्याचेही फिर्यादीत नमुद आहे. शिवाय मानलेला मामा सुनील कोचर याचेही यासाठी सहकार्य असल्याचे फिर्याद पोलीसांत देण्यात आली आहे.