महाजनांच्या गैरकृत्याच्या सीडीसाठी खडसेंकरवी पोलिसांतर्फे झाडाझडती; प्रफुल्ल लोढा यांचा आरोप

Eknath-Khadse-Girish-Mahaja
Eknath-Khadse-Girish-Mahaja

जळगाव : गिरीश महाजन व रामेश्‍वर नाईक यांच्या कथित गैरकृत्याची फाईल व सीडी मिळविण्यासाठी बीएचआर पंतसंस्थेचा चौकशीचा बहाणा करून पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने एकनाथ खडसे यांच्या दबावाने आपले मित्र व माझ्या चुलत भावाच्या घरावर धाड टाकली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल लोढा यांनी केला आहे. त्यांनी निखिल खडसेंच्या दहा वर्षांपूर्वी केलेल्या आत्महत्येच्या चौकशीची मागणीही केली. 
प्रफुल्ल लोढा हे महाजन यांचे एकेकाळचे सहकारी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच महाजन यांच्यावरही आरोप करत त्यांच्या गैरकृत्याचे पुरावे असल्याचे सांगितले होते. याच प्रफुल्ल लोढा यांनी आज जळगाव येथे हॉटेल फोर सीझन येथे पत्रकार घेतली. यावेळी ते म्हणाले, बीएचआर पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी एकमेकाला अडचणीत आणण्याचे काम केले. ते आता जनतेच्या भावनाशी खेळत असून त्याचा प्रत्यय आपल्यालाही आला आहे. 

सीडी मिळविण्यासाठी धाड 
बीएचआरशी आपला संबंध नाही, मात्र त्यांचा बहाणा करून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या दबावामुळे पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे मित्र सुनील कोचर आणि मुबंईला माझे चुलत भावाचे लोढा भवन येथे झाडाझडती घेतली. न्यायालयाची कोणतीही परवानगी नसताना पारस ललवाणी यांना घेऊन सिल्लोड येथे सुनील कोचर यांच्या घराची झडती घेतली. महाजन व नाईक यांच्यासंबंधी सीडी मिळविण्यासाठी हा प्रकार केला. यामुळे कोचर यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांची परिस्थिती सुधारल्यावर आपण याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. 

खडसेंनी ती फाईल मागितली 
खडसेंनी त्यासंदर्भात फाईल मला मागितली होती. राजकारणातील मोठे नेते मी संपविले आहेत. तू माझ्या नादी लागू नकोस, कोणत्याही खोट्या गुन्ह्यात मी तुला संपवून टाकेन असा अशी धमकीही खडसेंनी दिल्याचा आरोप लोढा यांनी केला. 

निखिलच्या आत्महत्येची चौकशी करा 
लोढा म्हणाले, खडसे यांचा मुलगा व माझा मित्र (कै.)निखील हा व्यसनी होता. त्यामुळे खडसे यांना खाली बघण्याची वेळ येत होती. त्यामुळे निखिलने आत्महत्या केली की खडसेंनी ती करवली, याबाबत चौकशीसाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे लोढा म्हणाले. 
 
ज्या व्यक्तीने दारुच्या नशेत, शुद्ध नसताना पत्रकार परिषद घेऊन आरोप केले, अशा दारुड्या व्यक्तीच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही. त्याच्या आरोपांना उत्तर देण्याची कोणतीही आवश्‍यकता नाही. 
- एकनाथराव खडसे, माजी मंत्री. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com