esakal | गिरणेत आवर्तन सुटले; अचानक पाणी आल्याने वाळूवाल्यांची पळापळ 
sakal

बोलून बातमी शोधा

girna river

जळगाव तालुक्यात आणि जिल्ह्या‍‍त मोजकेच वाळू ठेके सुरू करण्याची परवानगी चक्क वर्षभरानंतर देण्यात आली. कोरोना कालखंडात लॉकडाउनमुळे झालेल्या महसुलातील तूट भरून काढण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने नुकतेच आठवडाभरापूर्वी वाळू ठेक्यांना मंजुरी देत औक्षण केले.

गिरणेत आवर्तन सुटले; अचानक पाणी आल्याने वाळूवाल्यांची पळापळ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : गिरणा नदीच्या पातळीत सोमवारी (ता. २२) अचानक वाढ झाली. धरणातून आवर्तन सोडल्याने नदीपात्र अचानक भरून वाहत असल्याचे आल्हाददायक चित्र पाहावयास मिळाले. नदीपात्रात अचानक पाणी वाढल्याने कालमर्यादेत वाळू ठेके घेतलेल्या मक्तेदारांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. अचानक पहाटे पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रातील वाळू वाहतूकदारांची एकच धावपळ उडाली. 
जळगाव तालुक्यात आणि जिल्ह्या‍‍त मोजकेच वाळू ठेके सुरू करण्याची परवानगी चक्क वर्षभरानंतर देण्यात आली. कोरोना कालखंडात लॉकडाउनमुळे झालेल्या महसुलातील तूट भरून काढण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने नुकतेच आठवडाभरापूर्वी वाळू ठेक्यांना मंजुरी देत औक्षण केले. वाळूचोरी बंद होऊन बहुतांश सर्वच ठेके सुरू झाले असून, गिरणातून वाळूउपसाही प्रचंड प्रमाणात वाढला होता. वाळू उचल होणाऱ्या गावांतील नदीपात्रातून गावापर्यंतचे रस्तेही तयार करण्याचे काम वेगात सुरू झाले. काही ठेकेदारांनीच रस्ते तयार करून घेतले. बारा हजार रुपयांना मिळणारे वाळू डंपर आठच दिवसांत सात हजारांवर आले होते. 

नदीपात्रातील धोका वाढला 
वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात वर्षभरात मोठमोठ्या खदानीच खोदून ठेवल्या आहेत. नदीकाठावर जिथे कुठे बारीक वाळू आढळते तेथून नियमाच्या विरोधात जाऊन जेसीबी, पोकलँडद्वारे उपसा केल्यामुळे नदीपात्रात चक्क २० आणि ३० फुटांपर्यंत खड्डे झालेले आहेत. नदीपात्रात पूर्वसूचना न देताच सोमवारी पाण्याचे आवर्तन सुटल्याने वाळूउपशातून पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नेमका खोलीचा अंदाज येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.