esakal | लॉकडाउनची शांतता अन्‌ अचानक झाली फायरींग; दोन गट भिडले

बोलून बातमी शोधा

jalgaon news gun firing

वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्‍याने सर्वत्र शांतता आहे. परंतु अचानक झालेल्‍या फायरींगचा आवाज परिसरात पसरला आणि एकच खळबळ उडाली.

लॉकडाउनची शांतता अन्‌ अचानक झाली फायरींग; दोन गट भिडले
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : वीकेंड लॉकडाऊन सुरू असल्‍याने सर्वत्र शांतता आहे. परंतु अचानक झालेल्‍या फायरींगचा आवाज परिसरात पसरला आणि एकच खळबळ उडाली. जुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले असून यात एका गटाने फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.

शनिपेठ परिसरातील चौघुले प्लॉट भागात आज दुपारी दोन गटांमध्ये धुमश्‍चक्री झाली. या भागातील सारवान आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जुना वाद असून हा वाद आज पुन्हा उफाळून आला. या वादात एका गटाने फायरिंग केली. गोळी झाडल्यानंतर दोन्ही गटाच्या तरूणांनी घटना स्थळावरून पलायन केले. 

नागरीक धावत घराबाहेर
लॉकडाउन आणि यात रविवारचा दिवस असल्‍याने सर्वत्र शांतता होती. त्‍यात दुपारी कडक उन्हाचे चटके जाणवत असल्‍याने कोणीच बाहेर निघालेले नव्हते. परंतु, भर दुपारी दोनच्या सुमारास असलेल्‍या स्‍मशान शांततेत फायरींग झाल्‍याचा आवाज आला. आणि घरात बसलेले लोक कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी घराबाहेर आले होते.

पोलिसांकडून चौकशी सुरू
सदर घटनेची माहिती मिळताच शनिपेठसह एलसीबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून चौकशी करण्यात असून फायरिंग केल्यानंतर खाली पडलेले कार्टीरेज पोलिसांना आढळून आले असून पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करत आहेत. गोळीबार झालेल्‍या घटनेत समोरासमोर आलेले दोन्ही गटातील संशयितांबाबत माहिती घेणे सुरू असून संशयितांची नावे समोर आल्‍यानंतर त्‍यांना ताब्‍यात घेतले जाणार आहे.