
दोन दिवसांपुर्वी महामार्गावर अपघात होवून विवाहितेचा मृत्यू झाला होता. यानंतर आज दुपारी शिवकॉलनीजवळील रेल्वेपुलावर गंभीर अपघात होवून एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती कुठली याबाबत अद्याप तपास सुरू आहे.
जळगाव : जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यात शिवकॉलनी जवळील रेल्वे पुलावर दुपारी अपघात झाला. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी सव्वातीच्या सुमारास घडली.
जळगावतील महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असून महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात दोन दिवसांपुर्वी महामार्गावर अपघात होवून विवाहितेचा मृत्यू झाला होता. यानंतर आज दुपारी शिवकॉलनीजवळील रेल्वेपुलावर गंभीर अपघात होवून एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती कुठली याबाबत अद्याप तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...