मोकाट कुत्र्यांची समस्‍या सोडण्यासाठी मनपाच्या सभेतच आणली कुत्रे

jalgaon corporation
jalgaon corporation
Updated on

जळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दररोज नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटना घडत आहेत. तरीही महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शिवसेना या समस्येवरून चांगलीच आक्रमक झाली आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना महिला आघाडी, युवा सेना तसेच विविध सामाजिक संघटनांनी स्थायी समितीच्या सभेतच मोकाट तसेच पाळीव कुत्रे सोबत आणून प्रशासनाला निवेदन सादर केले. दरम्यान, मोकाट कुत्र्यांची समस्या येत्या आठवडाभरात सोडवली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 

जळगाव शहरातील विविध कॉलन्या तसेच उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. शहरात नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या काळात शहरात शेकडो अशा घटना घडल्या आहेत. मोकाट, पिसाळलेले कुत्रे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे अक्षरशः लचके तोडत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना महापालिका प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. सर्वसामान्य नागरिक मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. पण काहीएक उपयोग होत नसल्याने शेवटी आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
शिवसेना महिला आघाडीच्या सरिता माळी, अरुणा पाटील, भारती काळे, अमोल कोल्हे आदींसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोकाट तसेच पाळीव कुत्रे थेट सभागृहात आणून प्रशासनाला निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, प्रशासनाला जाग यावी, म्हणून प्रतिकात्मकरित्या कुत्र्याच्या पिल्लूच्या हातून निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी स्वीकारले. 

तर आम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबतच? 
दरम्यान, शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न हा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सत्ताधारी भाजपने याबाबत पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही सत्ताधाऱ्यांसोबतच आहोत. प्रशासनाने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com