सकाळी अकरानंतर रस्त्यावर दिसाल तर..जिल्ह्यात आजपासून ‘क्रॅकडाउन’

सकाळी अकरानंतर रस्त्यावर दिसाल तर..जिल्ह्यात आजपासून ‘क्रॅकडाउन’
jalgaon lockdown
jalgaon lockdownjalgaon lockdown

जळगाव : शहरासह जिल्ह्यात सोमवार (ता. १७)पासून कोरोना निर्बंधांची कडक (Jalgaon coronavirus) अंमलबजावणी होणार आहे. त्यात, सकाळी सात ते अकरा अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. अकरानंतर मात्र जिल्ह्यात संचारबंदी (Lockdown) लागू असेल. जर अकरानंतर नागरिक रस्त्यावर दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे, असा इशारा जिल्हा व पोलिस प्रशासनाने दिला आहे. (jalgaon start crackdown people no road)

jalgaon lockdown
‘क्रॅकडाउन’मध्ये राहणार करडी नजर; उद्यापासून अंमलबजावणी

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाला असला, तरी कोरोनाची संसर्ग साखळी पूर्णपणे तुटलेली नाही. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी, रस्त्यावर फिरणे, गल्लीबोळांत, टपऱ्या, हातगाड्यांवर रिकामे उभे राहणाऱ्यांची गर्दी, नियमांचे पालन न करणारे प्रवासी, वाहतूक रिक्षा आदींवर कडक कारवाई केली जाणार आहे. महिन्याभरापासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी कोरोना रुग्णसंख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही.

रूग्‍णाचे नातेवाईक होताय सुपर स्‍प्रेडर

कोरोना रुग्णालयात दाखल रुग्णांचे नातेवाईक आत-बाहेर जाऊन ते सुपर स्प्रेडर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तेथील रुग्णालयांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाला बाहेरूनच व्हिडिओ कॉल, केअर टेकर, वॉर्डबॉयच्या माध्यमातून संपर्क करू द्यावा. त्यांना रुग्णालयात जाऊ देऊ नये. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना राबविली असून, एक दिवस अगोदर लसीकरणाचे कूपन दिले जाणार आहे. कडक निर्बंधांच्या काळात लसीकरणासाठी जाणाऱ्यांनी स्वतःजवळील कूपन, ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा मेसेज जवळ ठेवावा, जेणेकरून त्यांना केंद्रावर जाता येईल.

jalgaon lockdown
संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

फिरणाऱ्यांवर होणार कारवाई

अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असताना दिसत आहे. अनावश्यक ठिकाणी गर्दी, फिरणे, मॉर्निंग वॉक, तसेच मेडिकल, दवाखान्याच्या नावाखालीदेखील अनेक जण फिरताना दिसत आहेत. चौकात, टपऱ्यांवर, हातगाड्यांवर अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हे व आर्थिक दंडदेखील केला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे.

फळ-भाजीपाला विक्रीच्या जागा बदलल्या

लॅाकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवेत असलेले फळ-भाजी विक्रेत्यांना सकाळी सात ते अकरा या वेळेत मुभा दिली आहे; परंतु येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे फळ-भाजीपाला विक्रीची नेहमीची ठिकाणे आता असणार नाहीत. दुसऱ्या ठिकाणी बाजार भरविला जाईल. नागरिकांनी त्यांच्या घराजवळील भाजीपाला विक्रेत्यांकडे जाऊन खरेदी करायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com