esakal | बापरे..जामनेरात चाललेय काय?; ऑक्‍सिजन संपला, रूग्‍ण दाखल न करण्याचे फर्माण
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen

बापरे..जामनेरात चाललेय काय?; ऑक्‍सिजन संपला, रूग्‍ण दाखल न करण्याचे फर्माण

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जामनेर (जळगाव) : शहरातील उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जाप्राप्त असणाऱ्या दवाखान्यामधे आता ऑक्‍सिजनचा साठाच नसल्याने ऑक्‍सिजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना यापुढे किमान १५ दिवस तरी दवाखान्यात दाखल करून घेण्यात येऊ नये; असे फर्माणच दस्तुरखुद उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी काढले आहेत.

शहर, तालुक्‍यातच काय तर संपुर्ण देशभरामध्‍ये दाखल कोरोना बाधीत रूग्णांसाठी सध्या ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. असे चित्र सर्वत्र असुन प्राणवायू अभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडत आहेत. एकीकडे कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ आणि दुसरीकडे ऑक्सीजन, बेड, रेमडेसिवीसह अन्य आवश्यक औषधांची चणचण बऱ्याचदा रूग्णांच्या जिवावर बेतत आहे.

कोरोना बाधीत रूग्णांची सद्यस्थिती..

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात विद्यमान परीस्थितीत एकुण ४८ रुग्ण दाखल असून २५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर पळासखेडा बु. येथील कोविड सेंटरमधे ७० रुग्णांवर उपचार सुरू असून दरोरोज शंभर रुग्णांच्या मागे दहाच्यावर रुग्ण कोरोना बाधीत निष्पन्न होत आहेत. त्यांचेसाठी इतर उपचार पुरेसे आहेत. यातुन बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही चांगली आहे.

ऑक्‍सिजनच नाही

ऑक्‍सिजन लागणाऱ्यांची व्यवस्था येत्या १५ दिवस तरी (ऑक्सीजन उपलब्ध होईपर्यंत) होऊ शकणार नाही; अशी माहिती नोडल अधीकारी डॉ. विनय सोनवणे यांनी ‘सकाळ’ला दिली. त्यामुळे ऑक्‍सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रूग्णांना नाईलाजास्तव जळगाव किंवा गोदावरीत पाठवावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top