किनगावजवळील अपघाताची पंतप्रधान मोदींकडून दखल; मृतांच्या नातलगांना दोन लाखाची मदत

राजेश सोनवणे
Monday, 15 February 2021

किनगावजवळ अंकलेश्‍वर- बऱ्हाणपुर राज्‍य मार्गावर रात्री सडेबाराच्या सुमारास पपईने भरलेला ट्रक पलटी झाला. यात दोन लहान मुलांसह पंधरा जण दबले गेल्‍याने जागीच मृत्‍यू पावले.

जळगाव : यावल तालुक्‍यातीन किनगाव जवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्‍या भीषण अपघातात आयशर ट्रक पलटी होवून यात पंधरा जणांचा मृत्‍यू झाला. या भीषण अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, अपघातग्रस्‍तांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

किनगावजवळ अंकलेश्‍वर- बऱ्हाणपुर राज्‍य मार्गावर रात्री सडेबाराच्या सुमारास पपईने भरलेला ट्रक पलटी झाला. यात दोन लहान मुलांसह पंधरा जण दबले गेल्‍याने जागीच मृत्‍यू पावले. यामध्ये आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. तर काही जण गंभीर जखमी आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अपघातग्रस्त झालेल्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदत
सदर अपघातातील मृत पावलेल्‍या व्यक्‍तीच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. तसेच शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी यात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news kingaon truck accident pm narendra modi help death parson family