केवायसी पडताळणीसाठी विशेष मोहीम; रेशनकार्डला मोबाईल, आधारचे सीडिंग 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग आणि मोबाईल सीडिंग अद्याप झालेले नाही अशा लाभार्थ्यांना ही कार्यवाही करता यावी, यासाठी शासनाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत विशेष मोहीम होणार आहे,

जळगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाचे सीडिंग १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकरारकडून प्राप्त झाल्या आहेत. शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग आणि मोबाईल सीडिंग अद्याप झालेले नाही अशा लाभार्थ्यांना ही कार्यवाही करता यावी, यासाठी शासनाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत विशेष मोहीम होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली. ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सीडिंगची कार्यवाही रास्त भाव दुकानदार करणार आहेत. ही कार्यवाही शुक्रवार(ता. १)पासून सुरू होत आहे. 

आधार कार्ड सीडींग 
जळगाव जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या एकूण ६ लाख ९ हजार ९२२ शिधापत्रिका असून पैकी, १२ हजार ७६० शिधापत्रिकांमध्ये एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक सीड झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील ६ लाख नऊ हजार ९२२ शिधापत्रिकेत एकूण २८ लाख ११ हजार २५२ लाभार्थी असून त्यापैकी २३ लाख ६८ हजार ७६ लाभार्थ्यांचे आधार सीड आहे. ४ लाख ४३ हजार १७६ लाभार्थ्याचे आधार क्रमांक सीड झालेले नाहीत. 

मोबाईल सीडिंग 
जळगाव जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या एकूण ६ लाख ९ हजार ९२२ शिधापत्रिका यापैकी ३ लाख ९२ हजार ५९३ शिधापत्रिकांमध्ये एकाही लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक सीड झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील ६ लाख ९ हजार ९२२ शिधापत्रिकेत एकूण २८ लाख ११ हजार २५२ लाभार्थी आहेत. पैकी ६ लाख दोन हजार ८१ लाभार्थ्यांचे मोबाईल सीड असून २२ लाख ९ हजार १७१ लाभार्थ्याचे मोबाईल क्रमांक सीडिंग झालेले नाही. ३१ जानेवारी पावेतो आधार सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे देय धान्य जोपर्यंत आधार सीडिंग होत नाही तोपर्यंत मिळणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news kyc cheaking reshan card and aadhar link