मध्यरात्रीचा थरार..घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत लुटले

robbery in home
robbery in home
Updated on

पहूर (जळगाव) : पाचोरा रस्त्यावरील महेश छाजेडनगरात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पहूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर येथील महेश छाजेडनगरात भागवत गायकवाड व त्‍यांची पत्‍नी भारतीबाई हे वास्‍तव्यास आहेत. आज मध्यरात्री भारतीबाई या शौचावरून घरात प्रवेश करीत असताना घराच्या मागील बाजूस दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्‍यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. यामुळे चेहरा स्‍पष्‍ट दिसून आला नाही. 

चाकूचा धाक
घरात प्रवेश केल्‍यानंतर भारतीबाई गायकवाड यांना दोघांनी चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची मागणी केली. सदर महिलेने घाबरून किचन ओट्याखाली ठेवलेला डबा काढून देत यामधील तीन ग्रॅमचे साधारण १२ हजार किमतीचे डोरले, २४ हजार किंमतीचे सहा ग्रॅमचे पदक, १६ हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे वेल, ४० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस, दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार किमतीच्या दोन नथ असे एक लाख १६ हजार वजनाचे दागिने डब्‍यातून काढत चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाचोरा विभागाचे डीवाएसपी भारत काकडे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Marathi News Esakal
www.esakal.com