esakal | पार्किंगमध्ये लावलेल्‍या दुचाकी पेटविल्‍या; मध्यरात्रीनंतरची घटना

बोलून बातमी शोधा

bikes fire
पार्किंगमध्ये लावलेल्‍या दुचाकी पेटविल्‍या; मध्यरात्रीनंतरची घटना
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : शहरातील गणपतीनगर परिसरामधील सम्राट हौसींग अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सम्राट हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या हिमान्शू रविंद्र महाजन यांची दुचाकी जळून खाक झाली आहे. ते आपल्‍या परिवारासह राहतात. शनिवारी (ता.१) सर्वजण जेवण करून झोपेल. अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये त्यांची दुचाकी (क्र. एमएच १५, एफबी ७७०७) पार्कींगला लावली होती. त्यांच्याच बाजूला येथील वाचमनची देखील (एमएच १९, ९३२६) दुचाकी होती.

दुचाकी अन्‌ इलेक्‍ट्रिक वायरचा कोळसा

मध्यरात्रीनंतर पवणेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुचाकीवर काहीतरी केमीकल टाकून पेटवून दिल्यात. यात दोन्ही दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. यासोबत अपार्टमेंटमध्ये असलेले इलेक्ट्रिक वायरर्स देखील जळाले आहे. याप्रकरणी सुनिल सुखवाणी यांच्या फियादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.