रात्री गप्पा मारल्या अन्‌ पहाटे घेतला गळफास

रईस शेख
Saturday, 19 December 2020

रात्रीचे जेवण घेवून परिवारातील सर्व सदस्‍य एकत्र बसले आणि गप्पा मारल्‍या. इकडच्या तिकडच्या गप्पा केल्‍यानंतर सर्वजण झोपले. पण दुसऱ्या दिवसाची सकाळ परिवारासाठी आक्रोश करणारी ठरेल असा विचार देखील त्‍यांनी केला नव्हता. ते या परिवाराला अघटीत घटनेतून आले.

जळगाव : अयोध्यानगरातील रहिवासी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. 

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जान्हवी मिलिंद खडके (वय १९, रा. हनुमान मंदिराजवळ अयोध्यानगर) या तरूणीने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. 

एकुलती एक लाडली
रात्री जान्हवीने कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारल्यानंतर अचानक तिने हे का केले, याबाबत आश्‍यर्च व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. जान्हवीचे वडील किराणा दुकान चालवितात. एकुलत्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. वडील मिलिंद, आई हर्षासह जान्हवीचा लहान भाऊ जतीन असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल नरसिंग पाडवी, सचिन मुंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत वृत्त कळताच नातेवाईकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news late night family tolk but girl suicide room