esakal | शेतमजुरांचे कामबंद, तरी मजुरीत नाही वाढ; लालबावटाचा पाठींबा
sakal

बोलून बातमी शोधा

lalbavta union

शेतमजुरांचे कामबंद, तरी मजुरीत नाही वाढ; लालबावटाचा पाठींबा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

यावल (जळगाव) : तालुक्यातील मनवेल व दगडी या गावातील शेतमजूर (Farmer) मजुरीचे दर वाढण्यासाठी गेल्या चार दिवसापासून संपावर होते. महागाईचा विचार करता त्यांना शेतमजूर किमान वेतन कायद्यानुसार (Agricultural Labor Minimum Wage Act) मजुरीही मिळत नसल्यामुळे शेतमजूर महिलांनी चार दिवस संप पुकारूनही त्यांची कोणीच दखल न घेतल्यामुळे महिला नाइलाजास्तव पुन्हा कामावर परतल्या आहेत. (jalgaon-manvel-village-farm-worker-strike-lalbavta-union-lead)

हेही वाचा: लग्नाच्या निम्म्या खर्चासाठी पत्नीचा छळ; पोलिसात तक्रार

ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग सोनवणे व ग्रामसेवक यांना शेतमजूर महिलांनी सह्यांनिशी निवेदन देऊन बेमुदत संप पुकारला होता. या शेतमजुरांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे रास्त वेतन देऊन ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन लालबावटा शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय कमिटी सदस्य कॉ. अमृत महाजन यांनी केले आहे. त्यांनी मनवेल येथे संपकरी शेतमजुरांची भेट घेतली.

मजुरांची संख्‍या जास्‍त

मजुरांच्या म्हणण्याप्रमाणे तेल, डाळ, दूध, साखर, चहा, गॅस व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू महाग झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे औषधींपासून विजदर, घरपट्टी, पाणीपट्टी, प्रवास भाडे सारखे वाढत असताना मजुरीत मात्र वाढ झालेली नाही. मजुरांचे शोषण होत आहे. शेतमजुरांना सर्वस्वी मालकांवर अवलंबून राहावे लागते. रोजगार हमीची कामे नाहीत. मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना कमी मजुरीमध्ये राबवून घेतले जाते, अशा अनेक समस्या मजुरांनी सांगितल्या आहेत. लाल बावटा शेतमजूर युनियनचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद एरंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सेक्रेटरी गोरख वानखेडे, शांताराम पाटील, गणेश माळी यांनी शेतमजुरांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.