esakal | लग्नाच्या निम्म्या खर्चासाठी पत्नीचा छळ; पोलिसात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Persecution of wife

लग्नाच्या निम्म्या खर्चासाठी पत्नीचा छळ; पोलिसात तक्रार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : शहरातील आरएमएस कॉलनीतील विवाहितेला लग्नासाठी लागलेल्या आठ लाखांच्या एकूण खर्चापैकी निम्मे रक्कम (चार लाख रुपये) माहेरून आणावेत, अशी मागणी करून तिचा छळ करणाऱ्या पतीसह (Persecution of wife) पाच जणांविरोधात रामानंदनगर (Jalgaon police) पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (jalgaon-four-year-Persecution-of-wife-police-case)

हेही वाचा: मुलांमध्ये कोरोनाची सौम्य असतील लक्षणे; भीती नको, काळजी घ्या

पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आएमएस कॉलनी येथील पूजाचा (२०१७ मध्ये) जळगाव शहरातीलच निवृत्तीनगरातील सुबोध प्रदीप मांडगे यांच्याशी विवाह झाला होता. या लग्नासाठी लागलेल्या आठ लाखांच्या खर्चापैकी पूजाने तिच्या माहेरून चार लाख रुपये आणावेत; यासाठी पती सुबोध यांच्याकडून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात झाली. त्यासाठी पतीसह सासरे, सासू, नणंद, नंदोई या सर्वांनी वेळावेळी शारीरिक व मानसिक छळ केला.

पूजा गेली माहेरी

छळ असह्य झाल्याने पूजा माहेरी निघून आल्या व त्यांनी रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून गुरुवारी रामानंदनगर पोलिसांत पती सुबोध मांडगे, सासरे प्रदीप मांडगे, सासू रत्नमाला मांडगे (सर्व रा. निवृत्तीनगर, जळगाव) व नणंद मेघश्री योगेश सोनवणे, नंदोई योगेश मोहन सोनवणे (दोघे रा. समृद्धी पार्क, औरंगाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहेत.