esakal | पत्‍ता विचारण्यासाठी महिलेला थांबविले; मोटारसायकलवरील दोघांनी लांबविली २४ ग्रॅमची पोत
sakal

बोलून बातमी शोधा

chain snatching

राष्ट्रीय विद्यालय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका साधना सुधाकर बारावकर (वय 58) ह्या भूषण मंगल कार्यालयजवळ शिवनेरीनगरात राहतात. मंगळवारी (ता.26) सायंकाळी गल्लीतील एका कुटुंबाकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या.

पत्‍ता विचारण्यासाठी महिलेला थांबविले; मोटारसायकलवरील दोघांनी लांबविली २४ ग्रॅमची पोत

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र ओरबाडून पळ काढला. सदर घटना शहरातील शिवनेरी नगरभागात घडली. याप्रकरणी भामट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील राष्ट्रीय विद्यालय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका साधना सुधाकर बारावकर (वय 58) ह्या भूषण मंगल कार्यालयजवळ शिवनेरीनगरात राहतात. मंगळवारी (ता.26) सायंकाळी गल्लीतील एका कुटुंबाकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या घरी परतल्या. घरी दाराजवळ शेजारी महिलेशी त्या बोलत असतांनाच एका मोटारसायकलवरून दोन तरूण त्यांच्या घरासमोर आले व पत्ता विचारू लागले. यानंतर त्या तरुणापैकी एकाने कागद बारावकर यांच्याकडे दिला. तो कागद बारावकर ह्या पाहत असतानांच डोळ्याचे पाते लवते न तोच एकाने बारावकर यांच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची 24 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून दुचाकीवरून पळ काढला. बारावकर यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत दुचाकीवरून आलेले दोघे भामटे धूम स्टाईलने फरार झाले. यानंतर साधना बारावकर यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुले कॉलनीत घरफोडी
शहरात घरफोडींसह दुचाकी चोरीच्या घटनांनी कहर केला असून शहरात चोरांची टोळीच सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. फुले कॉलनीतील रहिवासी रमेश वाल्मीक मांडोळे यांच्या बंद निवासाचे कडीकुलूप तोडून चोरट्यांनी 43 हजाराचा ऐवज लंपास केला. दिवसाढवळ्या ही चोरी झाली. मांडोळे कुटुंबीय बऱ्हाणपूर येथे शालकाच्या मुलाच्या नवस कार्यक्रमाला गेले होते. नवस आटोपून घरी परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. चोरट्यांनी घरातून 3 हजार रूपये किंमतीची पाच भार वजनाचे चांदीचे वेले व पायातील साखळी आणि रोख 40 हजार रूपये असा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. रमेश मांडोळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image