
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदी चित्रपटातील ‘तेरी मेहरबानीया..’ हे गीत सादर केले.
जळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतीत पाहण्यास मिळाली. भाषणात नेहमी शेरोशायरी करणारे गुलाबराव पाटील सर्वांनाच माहिती आहे. पण एका कार्यक्रमात माईक हाती आला आणि गाणे म्हणण्याची संधी मिळाली; ती संधी साधून त्यांनी ‘तेरी मेहरबानीया..’ हे गीत गायले.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदी चित्रपटातील ‘तेरी मेहरबानीया..’ हे गीत सादर केले. गाणे म्हणताना अगदी तालात गायल्याने उपस्थितही भारावून गेले आणि त्यांच्या गायनाला दादही दिली. मात्र शेरोशायरी करणारे गुलाबराव पाटील यांनी गायलेले गाणे हे एक चर्चेचा विषय ठरले. गुलाबराव पाटील यांच्या गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.
अनेक स्टेज गाजवले
गाणे गाण्यापुर्वी गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त कताना महाविद्यालयीन जीवनात नाटकात अभिनय केला. पोवाडे सादर करणे, गाणे म्हणणे मला आवडते. यातून मी अनेक स्टेज गाजवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.