esakal | ऑक्सिजनअभावी तिघांचा मृत्यू; २० रुग्णांना अन्य ठिकाणी हलविले
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

ऑक्सिजनअभावी तिघांचा मृत्यू; २० रुग्णांना अन्य ठिकाणी हलविले

sakal_logo
By
राजेश सोनवणे

मुक्ताईनगर (जळगाव) : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. अशात ऑक्सिजनअभावी तिघा रुग्णांचा बळी गेल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठा पुरेसा नसल्याने ऐनवेळी २० रुग्णांना बोदवडसह जळगावला हलविण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तीव्रता अधिक असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही मोठा विळखा बसला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असून, रुग्णांसाठी आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात ५७ ऑक्सिजन बेड आहेत. ते सर्व सध्या फुल आहेत.

दोघांच्या मृत्यूची चर्चा

ऑक्सिजन बेड असूनही ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ऑक्सिजनअभावी दोन दिवसांत दोन-तीन रुग्ण दगावल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

रुग्णांना अन्यत्र हलवले

दुसरीकडे ऑक्सिजन बेडही कमी पडू लागले आहेत. मुक्ताईनगरला ऑक्सिजन बेड असले तरी आज ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नव्हता. त्यामुळे २० रुग्णांना ऐनवेळी बोदवडसह जळगाव व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात आल्याचा प्रकारही गुरुवारी (ता.१५) समोर आला.

ऑक्सिजनअभावी नव्हे, तर गंभीर असल्याने त्या रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनचा पुरवठा संपणार असल्याचा अंदाज घेऊन ऐनवेळी अन्य ठिकाणी त्याची उपलब्धता पाहून रुग्णांना हलवावे लागले. दुपारी तीनला ऑक्सिजन उपलब्ध झाला.

- डॉ. योगेश राणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय