रात्री पोटावर झोपता..तर व्हा सावधान; आरोग्‍याच्या या समस्यांनी व्हाल हैराण

sleeping and health problem
sleeping and health problem

जळगाव : मानवी जीवनात झोप खुप महत्‍त्‍वाची आहे. कारण रात्रीची झोप ही दुसऱ्या दिवसाचे दिनचर्या ठरवून दिलेली असते. अर्थात जर रात्री चांगली झोप येत नसेल; तर त्याचा संपूर्ण दिवस आळशी आणि निरूत्‍सहाने भरलेला असतो आणि दिवसभर काम व्यवस्थित होत नाही. एका सर्वेक्षणानुसार आपल्या झोपण्याची पद्धत कशी आहे. यावर आपली झोप अवलंबून असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. समुद्रशास्त्रामध्ये याबाबत माहिती आहे.

हे दुखणे लागते
पोटावर झोपल्याने अनेक समस्‍या जाणवू लागतात. यात प्रामुख्याने मान दुखण्याची समस्या जाणवते. कारण पोटावर झोपल्यानंतर मान एका साईडला असते. यामुळे मानेचे स्नायू ताणवतात आणि रक्त परिसंचरण चांगले होत नाही. दुसरा त्रास हा पाठदुखीचा होतो. पोटावर झोपण्यामुळे पाठीचे स्नायूचा नैसर्गिक आकार बदलतो. तिसरा त्रास गुडघे दुखण्याचा होतो. अशा झोपण्यामुळे हाडांची स्थिती योग्य राहत नाही. त्यामुळे हाडे योग्य स्थितीत नसल्यास गुडघे दुखण्याची शक्यता जाणवते. तसेच चेहरा दाबून राहतो. यामुळे चेहऱ्याला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नसल्‍याने चेहऱ्यावर मुरुम आणि सुरकुत्या होण्याची समस्या उद्भवत असते. मुख्य म्‍हणजे पोटावर झोपल्‍याने अन्न योग्य प्रकारे पचन होत नाही. अन्न व्यवस्थित पचले नाही तर इनडाइजेशन सारखी समस्या सुरू होते. यामुळे अन्न पचवायचे असेल तर पोटावर झोपणे टाळा.

पाठीवर झोपणे आरोग्‍यासाठी चांगले
आपण आपल्या पाठीवर झोपून दोन्ही पाय पसरता आणि दोन्ही हात आपल्या डोक्या जवळ कोपर ठेवून झोपायला हवे. झोपेसाठी ही पद्धत चांगली मानली जाते. या अवस्थेत डोके, हात- पाय आणि मणक्याचे हाडे नैसर्गिक स्थितीत राहतात. या स्थितीत झोपल्याने स्नॉरिंग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तणाव वाढण्याची शक्यता वाढते. त्‍याचप्रमाणे डाव्या बाजूने झोपल्‍यास त्‍याचे फायदे होतात. संशोधनानुसार या अवस्थेत झोपेमुळे हृदयविकार, पोट खराब होणे, गॅस, आंबटपणा आणि थकवा यासारखा त्रास होत नाही. 

झोप किती आणि कधी
चांगली झोप होणे हे आपल्‍या दुसऱ्या दिवसाच्या दिनचर्येवर परिणाम करणारे असते. अर्थात कमी झोप एखाद्या व्यक्तीच्या कामगिरीवर परिणाम करते. याशिवाय नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्‍यास अस्वस्थता, डोकेदुखी आणि आळशीपणा जाणवत असतो. शिवाय रात्री उशिरापर्यंत जागरण करून कमी झोप झाल्‍यास देखील दुसऱ्या दिवशी शरिरावर त्‍याचा परिणाम जाणवत असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com