esakal | चांगली बातमी...८३ वर्षीय आजीची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

Grandma overcomes Corona

शहरात १० दिवसांपूर्वी कूठेही खाजगीत बेड उपलब्ध होत नव्हता. अशा बिकट परिस्थितीत प्रांताधिकारी सिमा आहिरे, डॉ. प्रकाश ताळे यांच्या सहकार्याने येथील इंदिरा भवनातील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध झाला.

चांगली बातमी...८३ वर्षीय आजीची कोरोनावर मात

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. अनेक तरुण तरुणीचा ही या कोरोनात मृत्यू होत असतांना मात्र अमळनेर ग्रामिण रूग्णालयातून आज श्रीमती शकूंतलाबाई तूळशीराम सोनार या  ८३ वर्षीय आजीबाईने कोरोना वर मात करीत सूखरूप घरी परतल्या. या घटनेने अमळनेरकराना हायसे वाटले.

शहरात १० दिवसांपूर्वी कूठेही खाजगीत बेड उपलब्ध होत नव्हता. अशा बिकट परिस्थितीत प्रांताधिकारी सिमा आहिरे, डॉ. प्रकाश ताळे यांच्या सहकार्याने येथील इंदिरा भवनातील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध झाला. सुरुवातीला आजींचे ७० ते ७२ ऑक्सीजन होता. तीन दिवसानंतर ऑक्सीजन पातळी वाढण्यासाठी पुन्हा ग्रामिण रूग्णालयात डॉ. ताळे यांनी बेड उपलब्ध केला. 

तीन दिवसानंतर वाढला ऑक्‍सीजन बेड
उपचाराला आजींनी योग्य साथ दिल्यामुळे आठवडाभरात आजींचे ऑक्सीजन लेव्हल ९५ पर्यंत आली. डॉ. प्रशांत कूलकर्णी व ग्रामिण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यानेच ८३ वर्षीय आजीबाई आज घरी पोहचल्यात त्या बद्दल त्यांच्या नातेवाईकांनी सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सहकारी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. डॉ. तनूश्री फडके, डॉ. शिरिन बागवान, डॉ. अशिष पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. परेश पवार हे ग्रामिण रूग्णलयातील वैद्यकीय सहकारी अहोरात्र रूग्णांना सेवा देत आहेत. 

कोरोना महामारी ने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरीकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमाचे पालन करावे. सद्याच्या इंदिरा भवनातील कोविड सेंटर मध्ये उद्या पर्यंत ऑक्सिजन सिलेंडर येतील व २३ बेड आँक्सीजनचे होतील. ग्रामीण रूग्णालयातही ३३ आँक्सीजन बेड सद्या सूरू आहेत. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून घाबरून न जाता काळजी घ्यावी       
- डॉ प्रकाश ताळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रूग्णालय अमळनेर       

संपादन- राजेश सोनवणे