रुग्णवाहिकांना आता मोफत इंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel

रुग्णवाहिकांना आता मोफत इंधन

पाचोरा (जळगाव) : पाचोरा व भडगाव तालुक्यांसह परिसरातील कोरोना रुग्णांची (Corona patient) ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन सिलिंडरचे (Oxygen cylinder) जळगाव येथून पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे वाटप करणाऱ्या वाहनांना मोफत पेट्रोल-डिझेल उपक्रमाचा प्रारंभ पाचोरा येथे खासदार उन्मेष (MP Unmesh patil) पाटील यांच्या हस्ते झाला. (corona patient ambulance free petrol diesel)

रिलायन्स इंडस्ट्रीज व पाचोरा येथील रिलायन्स पेट्रोलपंपाचे संचालक रूपेश शिंदे यांनी पुढाकार घेऊन रिलायन्स पेट्रोलपंप पाचोरा यांच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांची ने-आण करणाऱ्या खासगी व शासकीय रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना दर दिवशी ५० लिटर मर्यादेपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल रिलायन्स पेट्रोलपंप, पाचोरा येथे मोफत टाकून मिळणार आहे. यासाठी रुग्णवाहिकांना तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सहीचे पत्र आवश्यक आहे. या उपक्रमाचा प्रारंभ खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा: दिलासा..बाधितांची संख्या घटून साडेतिनशेच्या घरात

भाडे कमी आकारण्याचे आवाहन

खासदार पाटील यांनी रूपेश शिंदे यांचे कौतुक करून या उपक्रमामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ होईल व गरजू रुग्णांना कमी खर्चात इतर ठिकाणी जाऊन उपचार घेता येतील, असे सांगितले. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी रुग्णवाहिका चालकांना कोरोना रुग्णांसाठी कमी भाडे आकरण्याचे आवाहन केले. तसेच सुरू केलेल्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना कसा लाभ मिळवून देता येईल, यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे रूपेश शिंदे यांनी सांगितले. तहसीलदार कैलास चावडे, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, नगरसेवक योगेश पाटील, पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, पाचोरा, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, भाजपचे सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top