जिल्‍ह्‍याला जलसंपदा मंत्री लाभल्‍यानंतरही प्रकल्‍प राहिले अपुर्ण; खडसेंचा महाजनांवर निशाणा

eknath khadse
eknath khadse

कळमसरे (जळगाव) : बऱ्याच वर्षांपासून निधीअभावी रखडलेले आहे. असे असताना पाडळसरे धरणाला मागील पंचवार्षिक काळात जळगाव जिल्ह्याला जलसंपदा मंत्री लाभल्यावर देखील निधी मिळाला नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी पाडळसरे धरणावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी निधीअभावी रखडलेले पाडळसरे धरणाला निधी मिळावा व कामाला गती मिळावी यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पाडळसरे धरणाला भेट देऊन निधी मिळावा; यासाठी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेते आणि लोकप्रतिनिधी आले होते. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पाडळसरे प्रकल्पावर भेटीप्रसंगी मत व्यक्‍त करत माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

तर गती मिळाली असती
खडसे म्हणाले, की पाडळसरे प्रकल्पाचे भूमिपूजन मी जलसंपदा मंत्री असताना 1997 साली केले. त्यावेळी कामाला गतीही मिळाली. मात्र यानंतर तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करूनही या प्रकल्पावर अन्याय झाला. या प्रकल्पाची गेल्या तेवीस वर्षात किंमत काही पटीने वाढल्याने त्याला अंदाजे तीन हजार कोटीच्या आसपास निधीची गरज होती. त्याला राज्य शासनाने किमान पन्नास टक्के काम आतापर्यंत केले असते; तर केंद्राचा निधी मिळायला मदत झाली असती. मात्र या प्रकल्पाबाबत बऱ्याच टेक्निकल समस्या असल्याने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील निधीसाठी प्रयत्न करून कामाला गती मिळेल असेही त्यांनी सांगून जळगाव जिल्ह्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाबाबत पाच वर्षे कोरडे आश्‍वासन दिल्याने ही वेळ आज तालुक्यातील शेतकऱ्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com