प्रेमविवाहाचा दुसरा दिवस अन्‌‌ चोवीस तासाच्या अंतराने पत्‍नीनंतर पतीचाही मृत्‍यू

राजेश सोनवणे
Saturday, 2 January 2021

गावातील शेजारी राहणाऱ्या तरुण- तरुणींचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही महिनाभर बेपत्ता झाले. प्रेम विवाह करुन दोघेजण घरी परतले. संसाराला सुरवात करण्यापुर्वीच

जळगाव : प्रेमविवाह केल्‍यानंतर दुसऱ्याच दिवशी तरूणीची संशयास्‍पद मृत्‍यू झाल्‍याची घटना पाळधी (ता.धरणगाव) येथे उघडकीस आली. तरूणीचा मृत्‍यू झाल्‍यानंतर चोवीस तासाच्या आतच त्‍या तरूणीचा प्रियकर पतीचा देखील रात्री उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. या

पाळधी (ता.धरणगाव) गावातील शेजारी राहणाऱ्या तरुण- तरुणींचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही महिनाभर बेपत्ता झाले. प्रेम विवाह करुन दोघेजण घरी परतले. संसाराला सुरवात करण्यापुर्वीच तरुणीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना घडली. मृत तरुणीचा मृतदेह संशास्पद असल्याने सासरच्या मंडळीनी तिचा घातपात केला असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. मात्र विषबाधा झाल्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. घटनेच्या दिवशी प्रियकर पती प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्‍याची प्रकृती खालावली होती. त्‍यास जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेरा मेरा साथ..
पाळधी गावातील आरती विजय भोसले (वय १९)आणि प्रशांत पाटील हे दोघे घरातून बेपत्ता होते. दत्त जयंतीच्या दिवशी दोघांवी मंदीरात जावून विवाह केला. यावेळी दोघांनीही देवाला साक्षीला सोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली. अर्थात जीना मरणा साथ-साथ याचीच प्रचिती पाहण्यास मिळाली. विवाहानंतर अवघ्‍या तीन-चार दिवसानंतर आरतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्‍यूनंतर अवघ्‍या चोवीस तासातच प्रशांत याची देखील प्राणज्‍योत मालवली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news paldhi love marriage couple death 24 hour