esakal | पारोळा बाजार समितीने उभारले सेंटर; हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

covid center

पारोळा बाजार समितीने उभारले सेंटर; हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचा शुभारंभ

sakal_logo
By
राजेश सोनवणे

पारोळा (जळगाव) : कोरोनाची दुसरी लाट भयावह आहे. तालुक्यात रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून कोविड सेंटर उभारणीचा प्रस्ताव आला. त्यास तत्काळ मंजुरी मिळत सोमवारी (ता. ३) प्रत्यक्ष कोविड सेंटरचे लोकार्पण होत आहे. या सेंटरमुळे गरीब, गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, बाजार समितीच्या कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दिली.

येथील बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेले १०० बेडचे हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, उपनिरीक्षक प्रिया दातीर, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे श्रीमती सिंहले, सभापती अमोल पाटील, उपसभापती दगडू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी डॉ. चव्हाण यांनी बाजार समितीच्या कोविड सेंटरसाठी वैद्यकीय डॉक्टर्स व त्यांची टीम, मुबलक प्रमाणात औषधी पुरवठा पुरविण्यात येईल. जिल्ह्यात नव्हेतर महाराष्ट्रात प्रथमच पारोळा बाजार समितीच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्यात आल्याने डॉ. चव्हाण यांनी बाजार समितीचे कौतुक व अभिनंदन केले. सभापती अमोल पाटील यांनी पारोळा तालुक्यासह एरंडोल व ग्रामीण भागातील रुग्णांना या कोविड सेंटर येथे मोफत उपचार दिला जाणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढणार

पारोळ्यात कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी डॉ. चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलताना सांगितले, की जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात लसीकरणाचा तुटवडा भासत आहे. यासाठी आरोग्य संचालक यांच्याकडे याबाबत सांगितले असता लवकरच ६० हजार लसी उपलब्ध होणार आहे. यामुळे लसीकरणाला वेग येणार आहे.

रेमडेसिव्हिरचा आग्रह धरू नये

रुग्णांची कोरोनाबाबतची स्थिती, लॅब पॅरोमीटर व केलेल्या रक्ताच्या चाचण्यांनुसार रेमडेसिव्हिर आवश्यकतेनुसार दिले गेले पाहिजे. यासाठी डॉक्टरांनी तसेच रुग्ण व नातेवाईक यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा आग्रह धरू नये, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. तसेच पारोळा ग्रामीण रुग्णालयात पुरेपूर औषधीसाठा उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

डॉ. योगेश साळुंखेंचा गौरव

पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांची तालुक्यात वैद्यकीय कामगिरी चांगली आहे. ते चोवीस तास रुग्णालयात रुग्णांवर उपचार व सेवा देत आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. आर. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन तर सचिव रमेश चौधरी यांनी आभार मानले.

loading image
go to top