गृहरक्षक झाले वाहतुक रक्षक; अपुर्ण पोलिस कर्मचाऱ्यांच्या अभाव 

संजय पाटील
Tuesday, 29 December 2020

सण, उत्सव, निवडणुका व इतर प्रसंगाच्या वेळी गृहरक्षक कर्मचारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत असल्यामुळे गृहरक्षक आता वाहतुक रक्षक असे बोलले जात आहे. 

पारोळा (जळगाव) : जिल्‍ह्‍यातील राजकारणाची परिपक्‍व पाठशाळा, राष्ट्रीय महामार्ग 6 व आशिया महामार्ग 46 म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पारोळा शहराला ब्रिटीश काळापासुन आमलात आलेली पोलिस कर्मचारी संख्खा जैसे थे आहे. यामुळे गृहरक्षक दलाकडे वाहतुकीची जबाबदारी सोपविली गेल्याने गृहरक्षक आता वाहतुक रक्षक झाल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तत्कालिन उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी गृहरक्षक (होमगार्ड) यांची भुमिका महत्‍त्वाची मानत या घटकाला प्रोत्साहित केले. सण, उत्सव, निवडणुका व इतर प्रसंगाच्या वेळी गृहरक्षक कर्मचारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत असल्यामुळे गृहरक्षक आता वाहतुक रक्षक असे बोलले जात आहे. 

वाहतुकीमुळे खोळंबा
महामार्गालगत चोरवड, कजगांव व अमळनेर रस्ता अशा तीन महत्‍त्वपुर्ण चौफुल्या आहेत. या चौफुलीच्या दोन्ही बाजुने वसाहती व शासकिय कार्यालय असल्याने नेहमीच वाहतुकीची वर्दळ या चौफुलीतून होत असते. त्यातल्या त्यात या चौफुलीलगत महामार्ग असल्याने ये- जा करणारी असंख्य वाहनांमुळे चौफुलीवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत राहते. काहीवेळा वाहन धारकांत शाब्‍दीक वाददेखील समोर आले आहेत. मात्र अपुर्ण पोलिस कर्मचारी यांचा अभाव असल्यामुळे गुन्हे शोधकामी वाहतुक पोलिसांकडे अन्य जबाबदारी सोपवली गेल्याने गृहरक्षक दल यांच्याकडे ती जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले.

वाहन धारकांचे सहकार्य अपेक्षित 
सध्या लग्नसराई व ग्रामपंचायत निवडणुकीमुळे महामार्गासह इतर वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी वाहन धारकांनी स्पर्धा न करता किंवा घाईघाईने वाहन न चालविता एकमेकांच्या मदतीने कोंडीच्या ठिकाणी सहकार्य केले. तर गर्दी न होता वाहतुक सुरुळीत होण्यास मदत होईल. यासाठी वाहनधारकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी आवाहन केले आहे.

महिन्यात दोन वेळा नोव्हेकल डे पाळला जावा 
नेहमी होत असलेली वाहतुकीची कोंडी त्यात मोटार सायकल स्वार यांची वाढती वर्दळ पाहता सामुहीक जबाबदारी समजुन महीन्यात दोन वेळा शहरात नो व्हेईकल डे पाळला जावा असा सुर जनमाणसात दिसुन येत आहे.शेजारील अमळनेर,पाचोरा अश्या तालुक्यांनी नो व्हेईकल डे या अभियन उपक्रमास सुरुवात केली असुन तालुक्यातील वाहन धारकांनी देखील या कार्यात सहभागी व्हावे एवढे मात्र निश्चित!

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola homegaurd road traffic cover