
कोरोना काळापासूनच कांद्याला भाव असल्याने कांदेपातला देखील जास्त भाव असल्यामुळे अनेकांनी नैवैद्यासाठी फक्त कांदेपात खरेदी केली.
पारोळा (जळगाव) : रोजच्या भाजीत फारसा उपयोग होत नसलेली पण भरीत करण्यासाठी आवश्यक असलेली कांद्याची भाव जरा जास्तच भाव खात आहे. यात चंपाशष्टी असल्याने कधी नव्हे; ते कांद्याच्या पातने शंभरी गाठली आहे.
खानदेशात खंडेराव या कुलदैवतला मान असुन दरवर्षी हा उत्सव नागरिक घरगुती वातावरणात साजरा करत असतात. चंपाशष्टी रविवारी साजरी होत असुन या पार्श्वभुमीवर कांदेपातने शंभर रुपये प्रतिकिलो भाव झाला आहे. मात्र बाजारपेठेत इतर भाजीपाल्यांचे भाव स्थिर असल्याचे दिसून आले.
चंपाशष्टी हा घरगुती उत्सव असला तरी परिसरातील व घरातील व्यक्ती बाजरीची भाकरीसोबत कांदेपात व वांगे भरीत करुन खंडेरायाची आरती करत नैवैद्य देतात. येडकोट येडकोट जय मल्हार.. असा जयघोष करतात. घरातील जुन्या व जाणकार व्यक्तींनी वांगेसट म्हणुन संकल्प केल्याने या दिवसांपासुन वांगे भरीत खाण्यास सुरुवात करतात. खोबरे वाटी व गुळ असा प्रसाद परिसरात वाटुन जय मल्हार असा घोष केला जात असतो.
अन्य भाज्यांचे दर स्थिर
कोरोना काळापासूनच कांद्याला भाव असल्याने कांदेपातला देखील जास्त भाव असल्यामुळे अनेकांनी नैवैद्यासाठी फक्त कांदेपात खरेदी केली. यावेळी बाजारात भाजी विक्रेते यांनी इतर भाजीपाला यांचा भाव स्थिर असल्याचे सांगितले.
पुर्वजांपासुन चंपाशष्टी
आजोबा (स्व) डाँ. अनिल मराठे यांनी धार्मिक वारसा जोपासत प्रभोधनातुन विकासात्मक कामांना प्राधान्य दिले. तो वारसा जोपासत असतांना घरातील देव्हाऱ्यात खंडेरायाची मुर्ती असल्याने रोजच आरतीतून परमेश्वर स्मरण परिवार करित असते. चंपाशष्टीच्या दिवशी घरात तळी भरली जावुन खंडेरायाचा जयघोष केला जातो. चंपाशष्टी हा सोहळा आनंदात साजरा केला जात असुन यास अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिक मराठे यांनी सांगितले. दरम्यान सायंकाळी 5 वाजता कांदेपात बाजार विक्री झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
संपादन ः राजेश सोनवणे