
तहसील कार्यालयात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतप्रसंगी तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार बी. शिंदे व राकेश पाटील यांच्यासह ग्रा. प. सदस्य, प्रतिनिधी उपस्थित होते.
पारोळा (जळगाव) : येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात अनेक दिग्गजांना हादरा बसुन तालुक्यात ‘कही खुशी कही गम’ दिसून आले. तर सर्वसाधारण प्रवर्गात घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकित लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
तहसील कार्यालयात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतप्रसंगी तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार बी. शिंदे व राकेश पाटील यांच्यासह ग्रा. प. सदस्य, प्रतिनिधी उपस्थित होते.
आरक्षणात सुरवातीला अनुसुचित जातीसाठी चार ग्रामपंचायत लोकसंख्यानुसार काढण्यात आल्या. यात पळासखेडे बु, विचखेडे, शिरसोदे व पिंप्री प्र. उ. तर अनुसूचित जमातीसाठी दहा ग्रा. प. साठी बहादरपूर, तामसवाडी, करमाड, कन्हेरे, विटनेर, सावखेडा होळ, खोलसर, खेडीढोक, म्हसवे व चिखलोदबू यांचा समावेश आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग- ओबीसीसाठी बाहूटे, आंबापिंप्री, मेहु, मोंढाळे प्र. अ. व प्र. उ., उंदिरखेडे, सबगव्हाण प्र. अ., मोहाडी, सांगवी, टोळी, कंकराज, कोळपिंप्री, पोपटनगर, पळासखेडे, भिलाली, मोरफळ, सावखेडे मराठ, ढोली, देवगाव, बोदर्डे या ग्रामंपंचायतींचा समावेश आहे.
यांना बसला आरक्षणाचा फटका
तामसवाडी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतमध्ये अनु. जमातीसाठी आरक्षण निघाल्याने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या समर्थक पँनलचा हिरमोड झाला. तर परिवर्तन झालेल्या पिंप्री प्र. उ. मध्ये ही हेच आरक्षण निघाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते व पती- पत्नी निवडून आलेले गुलाब पाटील यांचा ही हिरमोड झाला. हिच परिस्थिती करमाड येथेही आरक्षणामुळे निरुत्साह दिसून आला. तर विचखेडे येथे ग्राप अविरोध झाल्याने सरपंच आरक्षणाकडे लक्ष लागून होते. तेथे सर्वसाधारण जागेची अपेक्षा होती. मात्र अनुसूचित जातीचे आरक्षण निघाले.
या गावांना झाला फायदा
तालुक्यातील देवगाव जे आमदार चिमणराव पाटील व बाजार समिती सभापती अमोल पाटील यांचे मूळ गाव आहे. त्यात ओबीसी आरक्षणामुळे युवा कार्यकर्ते समीर पाटील यांच्या सरपंच पदाचा रस्ता मोकळा झाला. तर अत्यंत चुरशीच्या लढती झालेल्या आंबापिंप्री ग्रामपंचायतलाही आरक्षणामुळे पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील यांच्या पँनलला फायदा मिळणार आहे. मुंदाने प्र. अ. मध्ये 9 पैकी 7 जागा मिळवणाऱ्या राजेंद्र पाटील यांच्या पँनलला आरक्षणाचा लाभ मिळाला. पंचायत समिती सभापती रेखा भिल यांच्या उंदिरखेडे ग्रा प मध्ये सेनेचे गणेश पाटील, वैशाली पाटील यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मुंदाणे प्र उ येथे महिला आरक्षण निघाल्याने तरुण उमेदवारांचा हिरमोड झाला. तर अवघ्या अनुसुचित जाती जागेसाठी निवडणूक लागलेल्या पळासखेडे बु. ग्रा. प. मध्ये तेच आरक्षण निघाल्याने येथ राष्ट्रवादीचा सरपंच होणार हे निश्चित झाले आहे.
घोडेबाजाराला येईल ऊत
तालुक्यातील ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महीला व पुरुष आरक्षण जाहीर झाले आहे या ठिकाणी घोडेबाजार होण्याचे संकेत मिळत असुन कोण कशी बाजी मारत सरपंच पदाचा बाजीगर होणार याकडे लक्ष लागुन आहे.
सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला 47 पैकी 23) - तरडी, जिराळी, शिवरे, बोळे, सुमठाणे, टिटवी, शेवगे प्र. ब., कराडी, टेहु, हिरापुर,
दऴवेल, वसंतनगर, करमाड बु, राजवड, उडणीदिगर, मोरफळ, भोलाणे, रत्नापिंप्री, शेळावेखु चबुत्रे, मंगरुऴ, वसंतवाडी, चोरवड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला 22 पैकी 11) - आंबापिंप्री, मेहु, मोंढाऴे प्र. ऊ, मोंढाळे प्र. अ, कंकराज, सांगवी, कोळपिंप्री, मुंदाणे प्र. ऊ, पोपटनगर, भिलाली, मोहाडी.
अनुसुचित जमातीसाठी (महिला 10 पैकी 5) - विटनेर, बहादरपुर, खेडीढोक, कन्हेरे, चिखलोद बु,
अनुसुचित जाती (महिला 4पैकी 2) - शिरसोदे व पिंप्री प्र ऊ
ासंपादन ः राजेश सोनवणे