esakal | उत्रडफाटा कि उत्रडकाटा; चुकीच्या फलकाकडे होते डोळेझाक!
sakal

बोलून बातमी शोधा

village name board

पारोळा - धरणगाव रस्त्यालगत उत्रडफाट्यासह हिरापुर, शेळावे बु, मोहाडी, खेडीढोक व दगडीसबगव्हाण असे फाटे येतात. या फाट्याच्या  एक ते दोन किमी अंतरावर गाव वसली आहेत.

उत्रडफाटा कि उत्रडकाटा; चुकीच्या फलकाकडे होते डोळेझाक!

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा (जळगाव) ः पारोळा- धरणगांव रस्तालगत असलेल्या फाट्यावर दोन नावांची दिशादर्शक फलके लावण्यात आली असुन फाट्यावर उत्रडफाटा तर फाट्याच्या शंभर मीटर लांब असलेल्या फलकावर उत्रडकाटा असे फलक लावले गेल्याने प्रवास करणार्या वाहतुक दारांसह रहीवाशी धारक यांचेत संभ्रम निर्माण झाला असुन संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे एकच गावाला दोन वेगवेगळी दिशादर्शक फलक लावण्यात आल्याने संबंधित विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असुन याबाबत लक्ष देवुन चुकीच्या फलकात दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांसह छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.

पारोळा - धरणगाव रस्त्यालगत उत्रडफाट्यासह हिरापुर, शेळावे बु, मोहाडी, खेडीढोक व दगडीसबगव्हाण असे फाटे येतात. या फाट्याच्या  एक ते दोन किमी अंतरावर गाव वसली आहेत. बाहेरगावाचे प्रवास करणारे हे दिशादर्शक फलकाच्या आधारे गाव ओळखत असतात. मात्र चुकीच्या फलकामुळे अनेकजण गोंधळुन जात असल्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त करुन फलक दुरुस्तीची मागणी केली आहे.
पारोळा- धरणगाव रस्त्याच्या बाजुला अनेक मराठी अक्षरात गावांच्‍या नावांची फलक लावण्यात आली आहेत. मात्र याच रस्त्यालगत पिंपडखेड मारोती ओलांडुन पहिल्याच फाट्यावर काळ्या अक्षरातील बोर्डावर येतांना व जातांना उत्रडकाटा असे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे; तर फाट्यालगत निळ्या रंगाचे बोर्डावर उत्रडफाटा असे बोर्ड लावण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमता निर्माण झाली असुन संबंधित विभागाच्या भोंगळ कारभारामुळे उत्रड फाट्यावर दोन दिशादर्शक फलकात वेगवेगळे नाव असल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असुन तात्काळ चुकीचे दिशादर्शक फलकाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चुकीच्या दिशादर्शक फलक शोधुन दुरुस्ती व्हावी 
तालुक्यात जवळपास 136 खेडी असुन अनेक रस्त्यांवर गावाची ओळख म्हणुन दिशादर्शक फलके लावण्यात आली आहे.मात्र अनेक फलकांची नावे ओळखली न जाणे, अस्पष्ट दिसणे, काही मोडकळीस आले असुन काही फलकांवर वाहनाची धडक लागल्याने आडवी पडणे तर काही चुकीची नावे अशा फलकांची शोधमोहीम राबवुन चुकीच्या फलकांची दुरुस्ती करण्याची मागणी छावा संघटनेचे विजय पाटील व पदाधिकारी यांनी सकाळशी बोलतांना केली असुन याबाबत लक्ष न दिल्यास छावा याबाबत आंदोलन करेल असा इशारा त्यांनी संबंधित विभागाला दिला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे