esakal | फडणवीसांनी सेनेला हिंदुत्व शिकवू नये 
sakal

बोलून बातमी शोधा

gulabrao patil devendra fadanvis

विलेपार्ले येथील शिवसेनेचे पहिले आमदार निवडून आले होते. परंतु हिदुंत्वामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली होती. तरीही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही,

फडणवीसांनी सेनेला हिंदुत्व शिकवू नये 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’करण्याबाबत महाविकास आघाडीतील तीन पक्ष बसून तोडगा काढतील असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी जाहिर केले आहे. त्यानुसार आम्ही हा निश्‍चित तोडगा काढणार आहोत. असे मत शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. 
जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले, कि औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’व्हावे ही बाळासाहेबांची ईच्छा होती. कोणत्याही शिवसैनिकांने औरंगाबाद कधीच संबोधले नाही, त्यांच्या मुखात नेहमी ‘संभाजीनगर’असाच उच्चार झाला आहे. त्यामुळे संभाजीनगर नाव देणे चुकीचे नाही. 
 
अजित पवार तोडगा काढणार 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना ते म्हणाले, कि औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरणाबाबत अजित पवार यांनीही मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले या बाबतीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बसून तोडगा काढणार आहोत. त्यामुळे या नामकरणावर निश्‍चित तोडगा निघेल. 
 
फडणवीसांनी हिंदुत्व शिकवू नये 
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करतांना मंत्री पाटील म्हणाले, कि भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा दावा आजचा आहे. मात्र शिवसेनेचा जन्मच हिंदुत्वासाठी झाला आहे. शिवसेनेचा पहिला आमदार हिंदुत्वामुळे रद्द झाला आहे. विलेपार्ले येथील शिवसेनेचे पहिले आमदार निवडून आले होते. परंतु हिदुंत्वामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली होती. तरीही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image