girish mahajan
girish mahajan

गिरीश महाजन पश्चिम बंगालला प्रचारार्थ रवाना 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्या मुळे पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात प्रचारात उतरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी (ता. ३१) सायंकाळी ते रवाना झाले. 
कोरोनाची लागण होण्यावरून माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांची जोरदार जुगलबंदी झाली. दोघा नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र दोघांनी एकमेकांच्या कोरोना लागणबाबत राजकीय टीका करून संशय व्यक्त केला होता. ही लागण खोटी असल्याचे म्हटले होते. मात्र दोन्ही नेत्यांची ही राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली. माजी मंत्री गिरीश महाजन हे मुंबई येथे उपचार घेऊन कालच जळगाव येथे आले. त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थितीची माहिती घेतली. 

महाजन यांनी केली टेस्ट 
गिरीश महाजन यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात जायचे असल्याने त्यांनी काल पुन्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना टेस्ट केली असल्याचे सांगण्यात आले. आज त्याचा अहवाल आला असून, ती निगेटिव्ह आली असल्याचे त्यांच्या स्विय सहाय्यकानी सांगितले. या अहवालामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचारासाठी जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ते औरंगाबादमार्गे विमानाने रवाना झाले. 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com