esakal | प्लॅटफॉर्म तिकीट ५० ऐवजी आता दहा रुपयांत
sakal

बोलून बातमी शोधा

railway platform ticket

प्लॅटफॉर्म तिकीट ५० ऐवजी आता दहा रुपयांत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भुसावळ (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर (Corona lockdown) गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाउन जाहीर करत केंद्र सरकारने रेल्वे वाहतूक बंद केली होती. अनलॉकनंतर हळूहळू रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाची (railway platform ticket) किंमत ५० रुपये केली होती, तर कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली होती. मात्र, आता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असून, देशभरात निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यामुळे आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री पुन्हा सुरू होत असून, ते पूर्वीच्या किमतीत म्हणजेच दहा रुपयांना मिळणार आहे. (railway-bhusawal-divison-Railway-platform-ticket-rate-ten-rupee)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकीट विक्री बंद केल्याने स्थानकावर नातेवाइकांना सोडण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता. मात्र, आता पूर्ववत प्लॅटफार्म तिकिटांची विक्री सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा: ‘अनलॉक’नंतरही उद्याने, मंदिरे अद्याप बंदच; स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा

१२४ स्थानकांवर सुविधा

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी ११ मार्चपासून भुसावळ विभागातील नऊ स्थानकांवर ५० रुपयांना प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येत होते. आता भुसावळ विभागातील १२४ रेल्वेस्थानकांवर आजपासून प्लॅटफॉर्म टिकीट दहा रुपयांना मिळणार आहे.

विभागातील नऊ स्‍थानकांचा समावेश

भुसावळ विभागातील नाशिकसह मनमाड, भुसावळ, जळगाव, खंडवा, अकोला, अमरावती, बडनेरा, शेगाव या नऊ स्थानकांवर हे तिकीट मिळत असले, तरी त्याचे दर ५० रुपये होते. पण, आता हे दर दहा रुपये असणार आहेत. याबाबत भुसावळ रेल्वे विभागाने माहिती दिली असून, त्यात म्हटले आहे, की कोरोना महामारीमुळे भुसावळ विभागातील नऊ रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरू केले होते. आता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवारपासून सुरू होणार आहे. सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असणार आहे.