esakal | ‘अनलॉक’नंतरही उद्याने, मंदिरे अद्याप बंदच; स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon garden

‘अनलॉक’नंतरही उद्याने, मंदिरे अद्याप बंदच; स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : शहरासह जिल्ह्यात १ जूनपासून ‘अनलॉक’ची (Jalgaon unlock) प्रक्रिया सुरू होऊन बहुतांश निर्बंध शिथिल झाले असले तरी उद्याने व मंदिरे अद्याप बंदच आहेत. क्रीडासंकुल, मैदान, जिम आणि सिनेमागृहांना मुभा देण्यात आली असली, तरी मंदिरे व उद्यानांबाबत अद्याप आदेश निघालेले नाहीत. (jalgaon-news-unlock-but-no-order-open-temple-and-garden_

हेही वाचा: अजूनही लसीकरणाबाबत उदासीनता

राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वृद्धिदर (पॉझिटिव्हिटी रेट) ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा १८ जिल्ह्यांत १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार संसर्गाचा वृद्धिदर कमी असलेल्या जिल्ह्यात जळगावचा समावेश असल्याने जिल्ह्यात ‘अनलॉक’ (Unlock) करण्यात आले आहे.

सर्व आस्थापना सुरू

लॉकडाउन काळात बंद असलेली अन्य दुकाने, सलून, स्पा, जिम, व्यापारी संकुले, सिनेमागृह, क्रीडासंकुल, मैदान आदी खुले करण्यास परवानगी मिळाली आहे. सोमवार (ता. ७)पासून या सर्व ठिकाणांसह हॉटेल, बारही ५० टक्के उपस्थितीनुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याने हॉटेलेही गजबजू लागली आहेत.

हेही वाचा: लग्नाच्या निम्म्या खर्चासाठी पत्नीचा छळ; पोलिसात तक्रार

मंदिर, उद्याने बंदच..

असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे व लहानग्यांना बागडण्यासाठी असलेली उद्याने अद्याप बंदच आहेत. उद्यानांमध्ये सायंकाळी गर्दी उसळत असते. ती होऊ नये म्हणून अद्याप उद्यानांना परवानगी मिळालेली नाही. मंदिरांमध्येही गर्दी टाळण्यासाठी अद्याप त्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढलेले नाहीत.

टप्प्याटप्प्याने होणार सुरू..

गेल्या लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर होणारी गर्दी व संसर्गाचा आढावा घेऊन मंदिर, उद्याने सुरू करण्यात आली होती. आताही त्याच पद्धतीने ही ठिकाणे सुरू करण्यात येतील. सुरवातीला उद्यानात केवळ मॉर्निंग वॉकसाठी सकाळी सहा ते आठ या वेळेत परवानगी असेल आणि नंतर स्थितीचा आढावा घेऊन ती पूर्ण खुली होतील. तर मंदिर व अन्य धार्मिक स्थळांबाबतही त्याच पद्धतीने निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता आहे.